नवीन वर्षाची सुरवात परमात्मा पांडुरंगाच्या पदस्पर्श दर्शनाने व्हावे यासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नववर्षाच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात ब्यू डायमंड नावाच्या फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे… -
या फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले आहे.
-
-
पंढरपूर येथे या वर्षी देखील भाविकांची गर्दी दिसून आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मंदिर समितीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली.
-
ब्ल्यू डायमंड या फुलांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा,सोळखांबी,प्रवेशद्वार आदी ठिकाणी आकर्षक फुलांनी सजविले आहे.
-
या फुलांच्या आरासित देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
-
मंदिर समितीने एक जानेवारी पासून मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे.
-
मंदिरात आल्यावर भाविक देवाचे,मंदिरात फोटो काढणे,मोबैल्व्र बोलणे या सारखे प्रक्रार होऊ लागले. यामुळे आजपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे.
-
भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी नामदेव पायरी जवळील संत ज्ञानेश्वर मंडप येथे ६०० लॉकरची व्यवस्था केली आहे. यासठी नाममात्र दोन रुपये आकारले जाणार आहेत.
-
तसेच काही भाविकांचा मोबाईल नजरचुकीने बरोबर आला तर मंदिरात प्रवेश करतात त्या ठिकाणी २५० लॉकरची व्यवस्था केली आहे
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ