-
युद्ध सरावासाठी निघालेले भारतीय सैन्यातील जवान. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
भारतीय लष्कराच्या टी 90 भीष्म, टी 72 अजेय, एमबीटी अर्जुन रणगाड्यांनी आपल्या क्षमतांची प्रात्यक्षिके सादर केली. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
शत्रूवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणार स्फोटक दाखवताना जवान. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
टी ९० भीष्म हे रशियन बनावटीचे रणगाडे असून भारताच्या गरजेनुसार त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
१९९२ पासून रशियन लष्करात टी ९० रणगाडयांचा वापर सुरु झाला. भारताने २००१ साली हे रणगाडे विकत घेण्यासाठी रशिया बरोबर करार केला. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
अर्जुन हा भारतीय बनावटीचा रणगाडा आहे. भारतीय संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने हा रणगाडा विकसित केला आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
भारतीय लष्कराने २००४ पासून अर्जुन रणगाडयाचा वापर सुरु केला. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
आमने-सामनेच्या लढाईत रणगाडे शत्रुवर चाल करुन जाताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
या युद्ध सरावाच्यावेळी अन्य सैनिकी वाहनांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
युद्ध सरावादरम्यान हेलिकॉप्टर आपले कौशल्य सादर करताना. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
अहमदनगरमध्ये युद्ध सरावाच्यावेळी रणगाडा हातळणार जवान.(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”