-
अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलणार अशी चर्चा रंगली होती.
-
मनसेचा आधीचा झेंडा हा विविध रंगांचा होता. त्यात वर निळा आणि तळाला हिरवा रंग होता. तर मध्ये या दोन रंगांपेक्षा थोडा मोठा भगवा रंग होता.
-
आज (गुरूवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अखेर मनसे पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले.
-
मनसेचा नवा झेंडा
-
मनसेच्या नव्या झेंड्यात संपूर्ण भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.
या झेंड्याच्या तळाच्या भागाचा आणि राजमुद्रेचा रंग तांबडा असून त्यावर पांढरी अक्षरे आहेत. -
मनसेच्या झेंड्याचा हा फोटो काही दिवसांपूर्वी दाखवण्यात आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती.
-
राज ठाकरे यांनी या झेंड्याचे अनवारण करण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.
-
बदल करण्यात आलेल्या झेंड्यावर तीन रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसंच भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल समोर आलेले फोटो…”