-
दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी Kia Motors ची नवीन कार Kia Carnivalला भारतात शानदार प्रतिसाद मिळतोय. Kia Seltos नंतर ही कंपनीची दुसरी कार आहे. (सौजन्य – ट्विटर)
ही MPV प्रकारातील कार भारतात 265 टचपॉइंट्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल . फेब्रुवारी महिन्यात ऑटो एक्स्पोदरम्यान(दि.५ फेब्रुवारी) ही कार लाँच केली जाण्याची दाट शक्यता आहे. (छाया सौजन्य- ट्विटर ) बाजारात टोयोटा इनोव्हाला टक्कर देणारी ही कार असेल. ही कार इनोव्हाचा प्रीमिअम पर्याय असेल. ( छाया सौजन्य-ट्विटर) 21 जानेवारी रोजी पहिल्यांदा बुकिंगला सुरूवात झाली आणि एकाच दिवसात Kia Carnival च्या 1410 युनिट्ससाठी बुकिंग मिळाल्याचा दावा कंपनीने केलाय. (छाया सौजन्य – ट्विटर) टॉप व्हेरिएंट Limousine ट्रिमसाठी सर्वाधिक बुकिंग मिळाल्याचं कंपनीने म्हटलं आहे.(छाया सौजन्य – ट्विटर) आतापर्यंत एकूण बुकिंगपैकी 64 टक्के बुकिंग टॉप व्हेरिएंटसाठीच आल्या आहेत. (छाया सौजन्य – ट्विटर) स्लायडिंग दरवाजे असल्याने ही एमपीव्ही काही प्रमाणात मिनी व्हॅनसारखी वाटते. भारतीय बाजारात येणाऱ्या मॉडेलमध्ये काही बदलही पाहायला मिळू शकतात. किआ कार्निवलमध्ये एका बाजूला स्लायडिंग दरवाजे देण्यात आले आहेत. पुढच्या बाजूला किआ सिग्नेचर ग्रिल आहे. काही देशांमध्ये या एमपीव्हीला सेडोना या नावानेही ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात ही एमपीव्ही 7, 8, आणि 11 सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात ही कार 6, 7 आणि 8 सीटर पर्यायांमध्ये असेल. एंट्री लेव्हल मॉडल 8 सीटर, तर टॉप मॉडल 6 सीटर असेल. भारतीय बाजारात या एमपीव्हीमध्ये बीएस6 उत्सर्जन मानकांची पूर्तता करणारं 2.2 लिटर 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 202 एचपी पॉवर आणि 441 एनएम टॉर्क निर्माण करेल. यासोबतच 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही मिळण्याची शक्यता आहे. लाँचिंगपूर्वीच मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही अत्यंत उत्साही आहोत अशी प्रतिक्रिया कंपनीकडून दिलीये. तर, प्री बुकिंग सुरू करताच एकाच दिवसात १४१० ऑर्डर मिळाल्या अशी प्रतिक्रिया किआ मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कुकह्यून शिम यांनी दिली. -
या इंजिनद्वारे 270 एचपी पॉवर आणि 318 एनएम टॉर्क निर्माण केला जातो. पण, भारतात हे इंजिन दिलं जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
-
आंतरराष्ट्रीय बाजारात ही एमपीव्ही 3.3 लिटर व्ही 6 पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे.
किआ कार्निवलची किंमत 24 ते 30 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?