-
७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या पथसंचलनात सेनेच्या प्रत्येक तुकडीने सहभाग घेतली. परंतु, २६ वर्षांच्या या महिला आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीने यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला चार चाँद लावले.
-
आपल्या चौथी पिढीची आर्मी ऑफिसर असलेल्या तान्या शेरगिल यांनी या परेडमध्ये सहभाग घेतला होता. पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी तान्या पहिली महिला अधिकारी ठरली आहे.
-
या पराक्रमामुळे देशभर सध्या त्यांचाच बोलबाला आहे. आर्मीच्या कॉर्प्स ऑफ सिग्नल्स या तुकडीची कॅप्टन असलेल्या तान्या शेरगिल पंजाबच्या होशियारपूर येथील आहे.
-
तान्या शेरगिल यांना चौथ्या पिढीची आर्मी ऑफिसर म्हटलं जातं. कारण, त्यांच्या आधी त्यांच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांनी सेनेत दाखल होऊन देशसेवा केली आहे. तानियाचे पणजोबा, आजोबा आणि वडील आर्मीमध्येच होते.
-
तान्या यांनी सांगितले की, अशा कोणत्याच सोहळ्यात या आधी सहभाग घेतला नव्हता. मात्र, संचलनात सहभागी होण्याची इच्छा लहानपणापासूनच होती.
-
सेनेतील महिलांचा आदर्श आहेस का, असे विचारले असता तान्या म्हणाल्या की, अशा अनेक महिला आहेत ज्यांनी माझ्यापेक्षाही उत्तम काम केले आहे. अनेक महिलांना मी माझ्यासाठी आदर्श मानते.
-
सेनेत भरती होण्यापूर्वी तानिया यांनी नागपूर विद्यापिठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या विषयात बी.टेक केले आहे.
-
पण, आर्मीमध्ये भरती व्हायचं हे त्यांचं लहानपणापासून स्वप्न होतं. त्यांनी सांगितलं की, ''लहानपणी मी माझ्या वडिलांना वर्दी घालताना पाहायचे. ड्युटीसाठी तयार होताना बघायचे. तेव्हापासून वाटायचं की अशी वर्दी आपल्यालाही मिळाली पाहिजे.''
-
''हा इतिहास घडवल्याचा अभिमान तर वाटतोच. पण, पाय जमिनीवर आहेत, त्याचा जास्त आनंद आहे,'' असंही तान्या यांनी सांगितलं.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित