-
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६१ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजाराम आणि आईचे नाव सविता राऊत आहे. 'ठाकरे' सिनेमातील गाण्याच्या रेकॉर्डींगच्यावेळी यशराज स्टुडिओमध्ये संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गायक सुखविंदर.
-
राजकीय नेते, खासदार असण्याबरोबरच संजय राऊत 'सामना' दैनिकाचे संपादक आहेत. इंडियन आर्ट फेस्टीव्हलच्या उद्घाटनच्याप्रसंगी संजय राऊत बॉलिवूड कलाकारा आणि गायकांसोबत.
-
तुम्हाला हे माहित आहे का? दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत अमेरिका आणि पाकिस्तानला भेट देणाऱ्या पत्रकारांच्या शिष्टमंडळामध्ये संजय राऊत सुद्धा होते. संजय राऊत माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीसोबत सेल्फी काढताना.
-
२००४ साली सर्वप्रथम संजय राऊत यांना शिवसेनेकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यानंतर २०१० आणि २०१६ मध्ये त्यांची फेरनिवड करण्यात आली. आता त्यांची खासदारकीची तिसरी टर्म आहे. संजय राऊत बॉलिवूडचा स्टार संजय दत्त सोबत.
-
दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुन याची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी त्याच्यासोबत फोटो पोस्ट केला व त्याला "आज भेटलो व एका महत्वाच्या प्रकल्पावर चर्चा केली. मराठी माणसाने भारतीय सिनेमाचा पाया घातला. पण दक्षिणेच्या सिने सृष्टीने त्यावर वैभवाचा कळस बांधला. मराठी सिने कलाकारांनी बाहुबली होणे गरजेचे आहे..पण मराठी प्रेक्षक दक्षिणात्या प्रमाणे जात्यंध कधी होणार" हे कॅप्शन दिले.
-
संजय राऊत यांना मोठे फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर संजय राऊत यांचे २८ हजार फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री वर्षा उसगावकर सोबत संजय राऊत.
-
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि कथा लेखन केले आहे.
-
राज्यसभेत खासदार असण्याशिवाय संजय राऊत यांनी संसदेच्या वेगवेगळया समित्यांवर सुद्धा काम केले आहे.
-
सामनाचे संपादक, राजकीय नेते, खासदार असा संजय राऊत यांचा प्रवास राहिला आहे. प्रचंड मेहनतीने ते आज या टप्प्यावर पोहोचले आहेत. महाराष्ट्रात आकाराला आलेल्या महाविकास आघाडीचे शिल्पकारांपैकी ते एक आहेत.

अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…