-
एक एप्रिल 2020 पासून भारतात प्रदूषण नियंत्रणासाठी भारत स्टेज-४ म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद होणार आहे. या वाहनांना पर्याय म्हणून १ एप्रिल २०२० नंतर भारत BS-6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे सर्व मोठ्या कंपन्यांनी आपल्याकडील शिल्लक BS4स्टॉक संपवण्यासाठी विविध ऑफर देत आहे. कंपनी डिसेंबर महिन्यापासूनच अनेक मॉडेल्स आकर्षक ऑफर्स आणि भरघोस सवलत देत आहे. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकीही आपल्या BS4 मॉडेल्सवर डिस्काउंट देत आहेत. येथे आपण जाणून घेऊया कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट ऑफर आहे …
Maruti Suzuki Celerio : मारुतीची Celerio ही कार तुम्ही 45,100 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करु शकतात. Maruti Suzuki S-Presso : मारुतीच्या या कारला भारतात शानदार प्रतिसाद मिळतोय. सध्या या कारवर तुम्हाला 17,500 रुपये डिस्काउंटची ऑफर आहे. Maruti Suzuki Vitara Brezza : जर तुम्हाला Vitara Brezza: खरेदी करायची असेल तर या कारवर 84 हजार 500 रुपयापर्यंतच्या डिस्काउंटची ऑफर आहे. Maruti Suzuki Dzire: ही कार म्हणजे कंपनीची सर्वाधिक यशस्वी कार. डिझायर BS4 मॉडेल तुम्ही 77 हजार रुपयांच्या सवलतीसह खरेदी करु शकतात. Maruti Suzuki Alto 800 : मारुतीची Alto ही कार देखील बरीच लोकप्रिय आहे. या कारच्या BS4 मॉडेलवर कॅश डिस्काउंट 25 हजार आणि 15 हजार रुपये एक्स्चेंज डिस्काउंट ऑफर आहे. Maruti Suzuki Eeco: याशिवाय Eeco कारवरही 40 हजार 100 रुपयांच्या डिस्काउंटची ऑफर कंपनीकडून आहे. Maruti Suzuki Swift : मारुतीच्या स्विफ्ट कारवरही कंपनी डिस्काउंट देत आहे. या कारच्या BS4 व्हर्जनवर 70 हजार 750 रुपये डिस्काउंट आहे. Maruti Suzuki Wagon R: ही कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय गाड्यांपैकी एक कार आहे. या कारच्या BS4 मॉडेलवर कंपनीकडून 35 हजार 100 रुपयांचे डिस्काउंट मिळेल.

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर