-
सचिन, धोनीपासून विराट कोहलीपर्यंत सर्वच क्रिकेटपटूंकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडिस, ऑडीसारख्या महागड्या कार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या भारतीय खेळाडूकडे कोणती महागडी कार आहे.
कर्णधार विराट कोहली सध्या भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. एकेकाळी वडिलांच्या स्कूटरवरून क्रिकेट अकॅडमीत जाणाऱ्या विराटकडे अनेक अलिशान कार आहेत. विराट कोहलीला ऑडी कंपनीच्या गाड्यांची विशेष आवड आहे. एसयूव्ही-कूप Q8,R8 V10,A8L W12क्वाट्रो,Q7 4.2 TDI आणि S6 या ऑडीच्या गाड्याचं कलेक्शन विराट कोहलीकडे आहे. -
माजी कर्णधार एम.एस धोनीकडे एकापेक्षा अनेक गाड्यांचं कलेक्शन आहे. धोनीकडे फरारी 599 जीटीओ ही गाडीदेखील आहे.
फरारीव्यतिरिक्त धोनीकडे हमर एच2, कस्टमाइज्ड स्कॉर्पिओ, लँड रोवर फ्रीलँडर 2, ऑडी क्यू7, मित्सुबिशी पजेरो SFX, टोयोटा कोरोला आणि SX4 या अलिशान गाड्या आहेत. -
क्रिकेटच्या सुरूवातीला सचिन तेंडुलकरकडे मारूती ८०० ही कार होती. आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरकडे BMW सारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.
-
Nissan GTR,Modena Ferrari, BMW M5, M6 Gran Coup आणि i8 या अलिशान आणि महागड्या गाड्या सचिनकडे आहेत.
-
विरेंद्र सेहवागकडे BMW 730 ld ही कार आहे. २०१७मध्ये सचिन तेंडुलकरने सेहवागला ही गाडी भेट दिली आहे.
युवराजच्या ताफ्यात लॅम्बॉर्गिनी मुर्सीलागो एलपी 640-4 आहे. या कारमध्ये 6.5 लीटरचे इंजिन देण्यात आले आहे. लॅम्बॉर्गिनीशिवाय Porsche 911, a BMW M5 आणि Audi A5 या गाड्याही युवराजच्य ताफ्यात आहेत. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माकडे बीएमडब्लू M-5 ही महागाडी गाडी आहे. या अलिशान गाडीची किंमत एक कोटी ५९ लाख आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज के.एल राहुलकडे Mercedes AMG C43 ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास ७५ लाख रूपये आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाजेडाच्या ताफ्यात Audi Q7 आणि Audi Q3 या महागड्या गाड्या आहेत. -
भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे Maruti Suzuki Swift, Hyundai Verna आणि Toyota Etios या महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.
स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमारच्या ताफ्यात MW 5-Series 530d-M-Sport ही महागडी आणि आलिशान गाडी आहे. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे ३२ आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. यामध्ये मर्सीडीज CLK, सी-क्लास कनवर्टीबल, फोर्ड इंडीवर आणि होंडा सिटी एड एक्सचा समावेश आहे. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी कर्णधार राहुल द्रवीडकडे BMW 5 सीरिज आणि Audi Q5 SUV या गाड्या आहेत. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंहकेड SUVs, Hummer , Mercedes Benz GL आणि Ford Endeavour या गाड्यांचं कलेक्शन आहे. (Image: Cow net worth) -
भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे अनेक गाड्यांचं कलेक्शन आहे. यामध्ये फोर्ड इंडीवर आणि मर्सीडीज ई-क्लासचा समावेश आहे.
भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारा महान कर्णधार कपिल देव यांच्याकडेही अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. यामध्ये BMW 5 सीरिज आणि पॉर्श पनामेरा या गाड्यांचा समावेश आहे. -
पहिल्याच कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणाऱ्या करूण नायरकडे लाल रंगाची Ford Mustang ही गाडी आहे.
-
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या ताफ्यात BMW E60 5-Series आलिशान कार आहे.
-
भारताचे माजी कर्णधार मोहमद अझहरुद्दीन यांच्याकडे HONDA CRV, AUDI Q 7 आणि Range Rover Sport या महागड्या गाड्या आहेत.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज