-
झपाटय़ाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूंने चीनमध्ये थैमान घातले आहे. चीनमधील वुहान शहर कोरोना विषाणूंचे केंद्र आहे. या शहरातील २५० भारतीयांना आता हलवण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत. (AP)
-
एकूण २७४४ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या नवीन विषाणुमुळे अनेकांना न्यूमोनियाची लागण झाली असून ४६१ जणांची प्रकृती गंभीर आहे. (REUTERS)
-
चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४४० जणांना या विषाणूची लागण झाली आहे.
-
या विषाणूच्या संसर्गाने ताप, कफ, श्वसनात अडथळे अशी लक्षणे दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. (REUTERS)
-
घातक अशा कोरेना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीन युद्धपातळीवर नवे रुग्णालय उभे करणार आहे. या आजाराचे मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहरातच हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. (REUTERS)
-
राजस्थानमध्ये करोना विषाणूची लागण झालेला एक संशयित रुग्ण आढळल्याने त्याला स्वतंत्र विभागात ठेवण्यात आले आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी रविवारी सांगितले. हा रुग्ण चीनमध्ये एमबीबीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाल्यावर भारतामध्ये परतला आहे. (AP)
-
कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. (REUTERS)
-
चौघांना मुंबई महापालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्षात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आणखी २ संशयित पुण्यात आढळून आले असून त्यांना नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
-
महाराष्ट्र सरकारने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन २६ जानेवारीपर्यंत ३७५६ प्रवाशांची स्क्रिनिंग (तपासणी) केलं आहे. यामध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणं असल्याचे ४ संशयित प्रवाशी आढळून आले आहेत. (REUTERS)

अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…