-
टाटा मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV)ही कॉम्पॅक्ट श्रेणीतील नवी कार मंगळवारी लाँच केली. Tata Tigor या कारनंतर नेक्सॉन ही टाटाची दुसरी इलेक्ट्रिक आणि पहिली एसयुव्ही कार आहे. याशिवाय देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही असल्याचा दावा कंपनीने केलाय. ( सर्व छायाचित्र सौजन्य – सोशल मीडिया)
-
Tata Nexon EV ही कंपनीची पहिलीच इलेक्ट्रिक एसयूव्ही कार असून यामध्ये नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
-
Tata Nexon Electric तीन व्हेरिअंटमध्ये ( XM, XZ+ आणि XZ+ LUX) बाजारात उतरवण्यात आली आहे.
टाटा नेक्सॉन ईव्हीच्या बेसिक व्हेरिअंट XM मध्ये फुल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, दोन ड्राइव्ह मोड, की-लेस एंट्री आणि पुश बटण स्टार्ट, ZConnect कनेक्टेड कार अॅप, फ्रंट-रिअर पावर विंडो आणि इलेक्ट्रिक टेलगेट यांसारखे फीचर्स आहेत. -
XZ+ व्हेरिअंटमध्ये ड्युअल टोन कलरचे पर्याय, 16-इंच डायमंड-कट अॅलॉय व्हिल्स, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, रिअर कॅमेरा आणि लेदर फिनिश स्टिअरिंग व्हिल आहेत.
नवी नेक्सॉन ZConnect अॅप्लिकेशनसह आली असून या मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये 35 अॅडव्हान्स कनेक्टेड कार फीचर्स मिळतील असं कंपनीने म्हटलंय. यात एसयुव्हेचे स्टॅटिस्टिक्स, रिमोट अॅक्सेस, सुरक्षिततेच्या फीचर्सचा समावेश आहे. -
या इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये प्रोजेक्टर लाइट्स, शार्प हेडलँम्प्स आणि एलईडी डीआरएल आहेत. कारमध्ये रुंद एअरडॅम, क्रोम बेझल्ससह फॉग लॅम्प, नवे अॅलॉय व्हिल्स आणि टर्न इंडिकेटर्ससोबत आउट साइड रिअर व्ह्यू मिरर्स आहेत.
-
भारतीय बाजारात या गाडीची टक्कर एमजी मोटर्सच्या ZS EV आणि ह्युंदाईच्या कोना इलेक्ट्रिक एसयुव्ही या गाड्यांसोबत असेल.
टाटा कंपनीने देशभरात इलेक्ट्रिक नेक्सॉनची एकच एक्स शोरूम किंमत ठेवलीये. -
ही कार एकदा पूर्ण चार्ज केली तर 312 कि.मी. पर्यंतचं अंतर पार करू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. स्टँडर्ड 15A AC चार्जरद्वारे बॅटरी 20 टक्के ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी 8 तासांचा वेळ लागेल. तर, फास्ट चार्जरद्वारे बॅटरी 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.
-
Nexon EV मध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. यामधील इलेक्ट्रिक मोटर 129ps ची ऊर्जा आणि 245Nm पीक टॉर्क निर्माण करते.
-
सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशिअर व्हाइट आणि मूनलाइट सिल्वर या तीन रंगांमध्ये ही इलेक्ट्रिक एसयुव्ही उपलब्ध आहे.
इलेक्ट्रिक नेक्सॉनच्या टॉप व्हेरिअंट XZ+ LUX मध्ये सनरूफ, प्रीमियम लेदर फिनिश सीट्स आणि ऑटोमॅटिक रेन सेंन्सिंग वायपर्स आणि ऑटोमॅटिक हेडलँम्प्स आहेत. नेक्सॉन ईव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 13.99 लाख, XZ+ ची 14.99 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंट XZ+ LUX ची किंमत 15.99 लाख रुपये आहे. या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत. लाँचिंगवेळी खुद्द रतन टाटा हे देखील उपस्थित होते.

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश