-
सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान आहेत. डाव्या आघाडीतील पाच पक्षांनी एकत्र येऊन फिनलँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य – सना मरीन इन्स्टाग्राम)
-
सना मरीन या अवघ्या ३४ वर्षांच्या आहेत. १६ नोव्हेंबर १९८५ रोजी त्यांचा जन्म झाला.
-
१० डिसेंबर २०१९ रोजी सना मरीन यांनी फिनलँडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली. त्यापूर्वी त्या वाहतूक मंत्री होत्या.
-
सना मरीन यांनी मावळते पंतप्रधान एन्टी रिने यांची जागा घेतली. एका आंदोलनावरुन रिने यांच्या पक्षाचा त्यांच्या सहयोगी पक्षाने पाठींबा काढून घेतला होता, त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या जागी सना मरीन यांची निवड झाली.
-
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्याप्रमाणे सना मरीन यांनी सुद्धा बाळाला जन्म दिला आहे. २०१८ मध्ये त्यांनी एका सुंदर कन्यारत्नलाा जन्म दिला.
-
“मी कधीही माझ्या वयाचा किंवा स्त्री असण्याचा विचार केला नाही. मी ज्या कारणामुळे राजकारणात आले त्या उत्साहवर्धक कारणांचा मी अधिक विचार करुन निर्णय घेते,” असं मरीन यांचे म्हणणे आहे.
-
फिनलँडमधील कार्यालयीन कालावधी कमी करुन तो दिवसला सहा तास करावा, त्याचप्रमाणे पाच दिवसांऐवजी चार दिवसांचा आठवडा करावा असा प्रस्ताव मरीन यांनी मांडला.
-
लोकांना त्यांच्या कुटुंबाबरोबर अधिक वेळ एकत्र घालवता आला पाहिजे या मताची मी आहे. लोकांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवावा, छंद जोपासावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम वगैरेसारख्या इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांना या वेळात करता येतील असे मरीन यांचे म्हणणे आहे.
-
सना मरीन २०१५ पासून खासदार आहेत. त्या पक्षाच्या उपप्रमुख आहेत. मागच्या सरकारमध्ये त्या वाहतूक मंत्री होत्या.
-
सना मरीन २००६ साली सोशल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये सहभागी झाल्या. २०१० ते २०१२ दरम्यान त्या पक्षाच्या उपाध्यक्ष होत्या.
-
सना मरीन (वय ३४) या जगातील सर्वाधिक तरुण राष्ट्रप्रमुख बनल्या आहेत. त्यांच्यानंतर युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होन्चारुक (वय ३५) हे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
-
“मी कधीही इतक्या कमी वयात मोठा राजकीय पल्ला गाठण्याचा तसेच पंतप्रधान होईल असा विचार केला नव्हता.” केवळ २७ वर्षांच्या असताना त्यांनी सक्रीय राजकारणात पाऊल ठेवले होते.
-
त्यांचे लहानपण खूपच कष्टात गेले. आर्थिक चणचण असतानाही आपल्या कुटुंबातील हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या सना पहिल्या सदस्या ठरल्या होत्या.
-
सना यांचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले आहे.
-
लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अजून भरपूर काम करावे लागणार आहे असे सना मरीन यांनी त्यांच्या वयासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…