-
अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन. आजच्याच दिवशी २००३ साली अवकाश मोहिमेदरम्यान झालेल्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आपल्या कर्तृत्वाने भारतीयांची मान जगभरात उंचावणाऱ्या कल्पना चावला यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
-
१७ मार्च १९६२ रोजी हरयाणातील कर्नालमध्ये कल्पना यांचा जन्म झाला. हरयाणात जन्मलेल्या आणि लहानपणापासून अवकाश भरारीची स्वप्ने पाहणाऱ्या कल्पना चावला यांनी जिद्दीच्या जोरावर त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले.
-
हरयाणातील जन्मलेल्या कल्पना चावला चार भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या.
-
कल्पना यांना घरात लाडाने मोंटू म्हटले जायचे.
-
कल्पनाने डॉक्टर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. मात्र कल्पना यांना लहानपणापासूनच अवकाशात झेप घ्यायची होती.
-
कल्पना यांनी १९८२ मध्ये चंदिगड ऍरॉनॉटिकल इंजिनियरिंग कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
-
१९८४ मध्ये टेक्सासमधील ऍरोस्पेस येथून कल्पना यांनी पदवी संपादन केली.
-
कल्पना रतन टाटांना आदर्श मानायच्या.
-
१९८८ पासून कल्पना चावला नासामध्ये कार्यरत होत्या.
-
अंतराळातील पहिल्या यात्रेदरम्यान त्यांनी अंतराळात ३७२ तास पूर्ण केले आणि पृथ्वीला २५२ प्रदक्षिणा घातल्या.
-
२००३ साली १ फेब्रुवारी रोजी अवकाशातून पृथ्वीवर परत येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट होऊन चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
अंतराळ मोहिमेवरुन परत येत असताना कल्पना चावला यांच्या 'स्पेसशटल कोलंबिया'चा अपघात झाला.
-
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना स्पेसशटलवरील कवच उडाल्याने झालेल्या या अपघातामध्ये यान पूर्णपणे जळून खाक झालं.
-
या अपघातामध्ये कल्पना यांच्यासहीत त्यांचे सहा अंतराळवीर मरण पावले.
-
कल्पना आणि त्यांचे सहकारी यांच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरुन त्यांच्या मृतदेहाच्या अवशेषांवर उथा येथील झियान राष्ट्रीय उद्यानामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
चावला यांच्या अंतराळ संशोधन कार्याच्या स्मृती टिकून राहाव्यात यासाठी त्यांच्या नावे दरवर्षी जगभरातून एका तरुणीला ‘इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी’कडून 'कल्पना चावला शिष्यवृत्ती' दिली जाते. अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
-
जगभरातून केवळ एकाच मुलीला कल्पना चावला शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे ही निवड खूपच प्रतिष्ठेची मानली जाते. परंतु ही निवड प्रक्रिया खूप कस पाहणारी आहे. इच्छुक विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती अर्जासोबत या विषयावरील एक शोधनिबंध पाठवावा लागतो. जगभरातून आलेल्या हजारो अर्जदारांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शोधनिबंधातील त्यांची शोधक वृत्ती याचा आढावा घेत एका विद्यार्थिनीची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.
-
२०१७ आणि २०१८ साली महाराष्ट्रातील दोन मुलींनी कल्पना चावला शिष्यवृत्ती मिळवली होती.
-
अमरावती येथील सोनल बाबेरवाल हिने २०१७ साली कल्पना चावला शिष्यवृत्ती प्राप्त केली होती.
-
तर २०१८ साली अनिशा अशोक राजमाने हीने ही मानाची शिष्यवृत्ती मिळवली होती.

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक