-
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली व्यक्ती म्हणजेच विंडोजचे संस्थापक बिल गेट्स यांच्या मुलीला तिच्या प्रियकाराने प्रपोज केलं आणि तिनेही त्याला होकार दिला.
-
जेनिफर बिल गेट्सने प्रियकर नायल नस्सारला लग्नासाठी होकार दिला आहे.
-
गेट्स यांची मुलगी जेनिफर ही २३ वर्षाची आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
जेनिफरला लग्नसाठी मागणी घालणारा नायल नस्सार २९ वर्षांचा आहे.
-
नायलनेच जेनिफर हो म्हटल्याचे इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत सांगितलं आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम नायल नस्सार)
-
"नायल नस्सार, तु तुझ्यासारखा केवळ तूच आहेस. तू मला अगदी सुखद धक्का दिला आहेस. पुढील आयुष्य तुझ्याबरोबर घालवण्यासाठी मी उत्सुक आहे," अशी पोस्ट जेनिफरने केली आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
नस्सारनेही जेनिफरनं होकार दिल्याचे सांगत फोटो शेअर केला आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
"तिनं हो म्हटलं. आता मी जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती असल्याचे मला वाटत आहे," असं नस्सारने जेनिफरने होकार दिल्याची पोस्ट करताना म्हटलं आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
गेल्या चार वर्षांपासून जेनिफर आणि नायल नस्सार रिलेशनशिपमध्ये होते. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घोड्यांच्या शर्यतीवेळी २०१६ मध्ये पहिल्यांदा जेनिफर आणि नायल यांची ओळख झाली होती. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
जेनिफर आणि नायल या दोघांनाही घोडेस्वारीची प्रचंड आवड आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
घोडेस्वारीची आवड असल्यानेच जेनिफर आणि नायल दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
जेनिफरप्रमाणेच नायलसुद्धा गर्भश्रीमंत आहे. त्याच्या पालकांची गल्फमध्ये मोठी आर्कीटेक्चर फर्म आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
नायल मुळचा इजिप्तचा आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
नायलचे बालपण कुवैतमध्ये गेलं आहे.
-
२००९ साली नायल उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेला. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
नायलने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम नायल नस्सार)
-
२०१३ साली मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. (सौजन्य: इन्स्टाग्राम नायल नस्सार)
-
नायलला घोडेस्वारीची आवड आहे. तो वयाच्या पाचव्या वर्षापासून घोडेस्वारी करतो. (सौजन्य: इन्स्टाग्राम नायल नस्सार)
-
नायलने आपल्या देशासाठी घोडेस्वारीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
जेनिफर सध्या न्यू यॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
जेनिफर आणि नायल लग्न कधी करणार आहेत याबद्दलची कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
मात्र लग्नानंतर नायल आणि जेनिफर न्यू यॉर्कमध्येच राहणार असल्याचे समजते. (सौजन्य: इन्स्टाग्राम जेनिफर गेट्स)
-
नायल २०२० ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये इजिप्तच्या संघाकडून घोडेस्वारी प्रकारात सहभागी होणार आहे.
-
बिल यांना जेनेफर आणि नायलच्या नात्याबद्दल कल्पना असल्याचे बोलले जात आहे.
-
जेनेफरला दोन भावंडे आहेत.

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली