-
चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ४२५ बळी गेले असून रविवारी एकूण ५७ जणांचा मृत्यू झाला. एकूण निश्चित रुग्णांची सोमवारपर्यंतची संख्या २० हजार ४३८ इतकी असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटलं आहे. एकूण २ लाख २१ हजार जणांचा रुग्णांशी थेट संपर्क आल्याने हे लोक देखरेखीखाली असल्याचे आयोगाने स्पष्ट केलं आहे. चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी असणारे वुहान हे करोना विषाणू प्रादूर्भावाचे मुख्य केंद्र आहे. या रुग्णावर उपचार करण्यासाठी चीनने काही दिवसांमध्ये हजार बेड असणारे अद्यावत रुग्णालय वुहान प्रांतामध्ये उभे केले आहे. मात्र या रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टरांना दिवसरात्र काम करावे लागत आहे. याच डॉक्टरांचे फोटो आता व्हायरल झाले आहे. पाहूयात काय आहे चीनमधील डॉक्टरांची परिस्थीती… (सर्व फोटो >> Image Credit – twitter/@PDChina)
-
हवेतून पसरणाऱ्या करोनामुळे डॉक्टरांना आणि उपचार करणाऱ्यांना सतत तोंडावर मास्क बांधावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडावर मास्कचे व्रण उठले आहेत.
-
अनेक डॉक्टरांना पुरेशी झोप मिळत नाहीय.
-
सोशल नेटवर्किंगवर करोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो शेअर केले जात आहेत.
-
व्हायरल फोटोंमध्ये अंग संपूर्णपणे झाकलेल्या जाड पोषाखांमध्ये डॉक्टर जागा मिळेल तिथे आराम करताना दिसत आहेत.
-
करोना संसर्गजन्य असल्याने डॉक्टरांना विशेष पोषाख घालून इलाज करावा लागत आहे.
-
अनेक फोटोंमध्ये तर डॉक्टर ऑप्रेशन थेअटर आणि लाद्यांवरच झोपलेले दिसत आहेत.
-
अनेक डॉक्टरांना तोंडावर घट्ट मास्क लावून ठेवल्याने जखमा झाल्या आहेत.
-
अनेक महिला डॉक्टरही करोनाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत.
-
या रुग्णावर उपचार करण्यासाठी चीनने काही दिवसांमध्ये हजार बेड असणारे अद्यावत रुग्णालय वुहान प्रांतामध्ये उभे केले आहे. तेथे अनेक डॉक्टर दिवसरात्र काम करत आहेत.
-
अनेक डॉक्टर जागा मिळेल तिथे आराम करताना दिसत या व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे.
-
हजारो डॉक्टर चीनमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी झटत आहेत.
-
अनेक फोटोंमध्ये तर डॉक्टर ऑप्रेशन थेअटर आणि लाद्यांवरच झोपलेले दिसत आहेत.

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली