-
झील इन्स्टिट्यूट पुणे आणि कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘इंक अलाइव्ह’ व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होतं. (एक्सप्रेस फोटो – आशिष काळे)
-
या कार्यशाळेचं उद्घाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द. फडणीस हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. (एक्सप्रेस फोटो – आशिष काळे)
-
कार्यशाळेला हजर असलेल्या विद्यार्थ्यांना यानिमित्तानं दिग्गज व्यंगचित्रकार एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. (एक्सप्रेस फोटो – आशिष काळे)
-
राज ठाकरे यांनी व्यंगचित्र आणि कलेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर शि.द. फडणीस यांच्याविषयीचा अनुभवही सांगितला. (एक्सप्रेस फोटो – आशिष काळे)
-
शि.द. फडणीस यांनी विद्यार्थ्यांना व्यंगचित्र काढण्याविषयी मार्गदर्शन केलं. (एक्सप्रेस फोटो – आशिष काळे)
-
विशेष म्हणजे शि.द. फडणीस यांनी विद्यार्थ्यांना व्यंगचित्रही काढून दाखवली. (एक्सप्रेस फोटो – आशिष काळे)
-
'शि.द. फडणीस यांचं व्यंगचित्र काढतानाच प्रात्याक्षिक मी पहिल्यांदा बघतोय' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्यासोबत राज ठाकरे. (एक्सप्रेस फोटो – आशिष काळे)

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक