-
जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १० हजार ते १५ रुपयांदरम्यान तुमच्यासाठी काही बेस्ट स्मार्टफोनचे पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया दमदार रॅम आणि पावरफुल प्रोसेसर असलेल्या अशाच बेस्ट आठ स्मार्टफोन्सबाबत –
1) – Oppo K1 ‘इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर’आणि गेम खेळणाऱ्यांना दर्जेदार अनुभव यावा यासाठी या स्मार्टफोनमध्ये हायपर बूस्ट तंत्रज्ञान आहे. -
इतर वैशिष्ट्यांबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये वॉटरड्रॉप नॉच, 6.4 इंच डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ग्रेडिअंट ग्लास रिअर पॅनलचा समावेश आहे. सेल्फीसाठी यामध्ये 25 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ( 4GB रॅम + 64GB स्टोरेज – किंमत 13,499 रुपये )
2) -Samsung Galaxy M30s गॅलक्सी एम३०एसचं खास वैशिष्ट्य म्हणजे ६,०००एमएच क्षमतेची पावरफुल बॅटरी तसंच, कंपनीनं स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत सुपर अमॉल्ड डिस्प्ले आणि एक्सनॉस ९६११ एसओसी प्रोसेसर दिला आहे. -
६,००० एमएच क्षमतेची बॅटरी असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाच अमॉल्ड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून यात ४८ मेगापिक्सल प्रयमरी कॅमेरासोबत ५ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि एक ८ मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेन्स दिली आहे. सेल्फीसाठी २४ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत – 12,999 रुपये )
3)-Realme 3 Pro: रिअलमी (Realme) कंपनीच्या Realme 3 pro ला चांगला प्रतिसाद मिळाला असून हा फोन बराच लोकप्रिय ठरलाय. -
25 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा आणि 16 मेगापिक्सल क्षमतेच्या मुख्य कॅमेऱ्यासह डु्युअल रिअर कॅमेरा असलेला हा फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB रॅम + 64GB स्टोरेज, आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत – 12,999 रुपये )
4) -Vivoचा हा फोन Android 9 Pie वर बेस्ड फनटच ओएस 9.2 वर चालतो. Vivo U20 स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसरवर काम करतो. पावरसाठी या फोनमध्ये 5000mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली. या फोनसोबत 18 वॅट फास्ट चार्जर देण्यात आला आहे. 4GB आणि 6GB असे दोन रॅमचे पर्याय आणि 64GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 10,990 रुपये. Vivo U20 Vivo U20 मध्ये 6.53 इंच FHD प्लस ‘हालो फुलव्यू डिस्प्ले’ देण्यात आला आहे. तसेच AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 16 मेगापिक्सल सोबत 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सॉर देण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेरामध्ये Vivo U20 ला 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. 5) -Vivo Z1 Pro : इन-डिस्प्ले कॅमेरा या फीचरसह सोनिक ब्ल्यू, सोनिक ब्लॅक आणि मिरर ब्लॅक अशा तीन रंगाचे पर्याय या फोनसाठी देण्यात आले आहेत. मल्टिटास्किंगमध्ये अर्थात एकाच वेळी अनेक अॅप्लिकेशनचा वापर करण्यात हा फोन अग्रेसर असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Vivo Z1 Pro स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एसडी 712 प्रोसेसर असून डेडिकेटेड AI बटण आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 व 2 मेगापिक्सलचे अन्य कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला असून याला पंच होल डिस्प्लेच्या डिझाईनमध्ये फिट करण्यात आलेले आहे. कॅमेऱ्याद्वारे दर्जेदार प्रतिमा घेता येणार असून यात फोर-के व्हिडीओचा सपोर्टही दिलेला आहे. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह तब्बल 5 हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ओएस 9 हा युजर इंटरफेस दिलेला आहे. हा फोन 4GB रॅम +64GB स्टोरेज, 6जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत – 13,160 रुपये ) 6)-Redmi Note 8 Pro : शाओमीचा 64 मेगापिक्सल क्षमतेचा दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Redmi Note 8 Pro (6 जीबी रॅम) 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला 64MP क्षमतेचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे 8MP+2MP+2MP क्षमतेचे आहेत. याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी 20MP क्षमतेचा कॅमेराही आहे. स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फीचर यामध्ये आहे. 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी यात देण्यात आली आहे. गामा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले असून यात 3D कर्व्ह्ड गोरिला ग्लासचा 5 पॅनलचा वापर करण्यात आला आहे. 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज अशा तीन विविध व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत असेल. उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट आहे, याद्वारे गेम खेळताना कोणत्याही समस्येशिवाय दर्जेदार अनुभव मिळेल असा कंपनीचा दावा आहे. (बेसिक व्हेरिअंटची किंमत 13, 847 रुपये) 7)-Realme 5 Pro : मागील बाजूला चार कॅमेरे असून त्यातील एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय एक कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी पुढील बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर आहे. Realme 5 Pro स्पार्कलिंग ब्ल्यू, क्रिस्टल ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. -
या स्मार्टफोनमध्ये 4,035 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच FHD+ ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. हा फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB रॅम + 64GB स्टोरेज, आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत- 12,950 रुपये )
-
8)Xiaomi Mi A3 : -48 मेगापिक्सल क्षमतेच्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.
हा फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत- 11,999 रुपये )

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही