-
भूवैकुंठ असलेल्या पंढरपुरात माघी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
-
एकादशीनिमित्त मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्नीक विठ्ठलाची नित्यपूजा केली.
-
त्याचबरोबर रुक्मिणीमातेची पूजा समितीचे लेखा अधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाली.
-
मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृह प्रवेशद्वारावर विविध फुलांची आकर्षक आरास तयार केल्यानं वातावरण खुलून गेलं होतं.
-
पुण्यातील मोरया ग्रुपतर्फे विठ्ठल मंदिरात ही फुलांची आरास तयार करण्यात आली.
-
झेंडू, शेवंती, स्पिंगर आणि जरबेरा या फुलांची आकर्षक सजावटीनं मंदिराला नवी झळाली आली.
-
पंढरपूर : माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणीमाता मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. यामध्ये गर्भगृहाची सजावट करण्यासाठी तब्बल २०० किलो फुलांचा वापर करण्यात आला.
-
भक्तांचा गोतावळा आणि टाळ-मृदूंगाच्या गजरात विठुरायाचा अखंड जयघोष यामुळे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं.वारकरी संप्रदायात माघ वारी महत्वाची मानली जाते. या वारीसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात.
-
पहाटेच्या गारव्यात चंद्रभागेत स्नान केल्यानंतर भाविकांना नगर प्रदक्षिणा पूर्ण करत विठ्ठलाच्या चरणी माथा ठेवला.
-
एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना चंद्रभागेच्या तिरावरील ६५ जागेत मुक्काम केला.

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली