-
Auto Expo 2020 च्या पहिल्याच दिवशी महिंद्राने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार महिंद्रा eKUV100 लाँच केली आहे.
लाँच होताच ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक वाहन ठरली आहे. -
काही दिवसांपूर्वीच टाटाने भारतातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही लाँच केली होती. पण, महिंद्राची eKUV100 ही कार म्हणजे मिनी एसयुव्ही आहे.
-
यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये अपेक्षेप्रमाणे 'इलेक्ट्रिफाईंग' वातावरण पाहायला मिळालं. बहुतांश कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार सादर केल्या.
-
eKUV100 या कारची संकल्पना ऑटो एक्सपो 2018 मध्ये मांडण्यात आली होती. पण, निर्मितीसाठी कंपनीने बराच वेळ घेतला. त्यामुळे कारमध्ये आजच्या परिस्थितीनुसार दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
-
दिसायला ही कार जवळपास पेट्रोल व्हर्जनप्रमाणेच आहे. कारच्या इंटेरिअरमध्येही कंपनीने अधिक बदल केलेला नाही. पण डिजिटल इंस्ट्रुमेंटऐवजी मोठी इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. (सर्व छायाचित्र सौजन्य- ट्विटर )
या कारमध्ये 40 kWh इलेक्ट्रिक मोटारचा वापर करण्यात आला आहे, याद्वारे 53 bhp पावर आणि 120 Nm पीक टॉर्क निर्माण होते. -
कारसोबत सिंगल-स्पीड ट्रांसमिशन उपलब्ध असेल याद्वारे कारच्या पुढील चाकांना पावर सप्लाय होईल.
-
कारमध्ये 15.9 kWh ची लीथियम-आयन बॅटरी असून सिंगल चार्जमध्ये म्हणजे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 120 किमीपर्यंतचा प्रवास करु शकेल असा कंपनीचा दावा आहे.
-
महिंद्रा eKUV100 या कारसोबत कंपनी सामान्य आणि फास्ट चार्जरचा पर्याय देते. 8.25 लाख रुपये इतकी या कारची एक्स-शोरुम किंमत ठरवण्यात आली आहे.
-
महिंद्राने आपल्या अन्य काही कारही यावेळी सादर केल्या. त्यात महिंद्राच्या Funster चाही समावेश होता.
-
आकर्षक लूकमुळे Funster ही कार सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली.
-
यासोबतच महिंद्राने Atom हे आपले नवे वाहनही सादर केले
-
Funster ही कार सर्वाधिक लक्ष वेधणाऱ्या गाड्यांपैकी एक ठरली.
-
छायाचित्र सौजन्य : @AEMotorShow ट्विटर
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच