एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी घटना चेन्नईमध्ये उघडकीस आली आहे. वाचा ही संपूर्ण घटना… (सर्व छायाचित्र सौजन्य : हॉटेल अंबिका एंपायर फेसबुक पेज, ambicaempire.com आणि in.hotels.com) -
एका थ्री-स्टार हॉटेलचे मालक असल्याची बतावणी करुन त्याच हॉटेलमध्ये बसून आणि तेच हॉटेल विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव पोलिसांनी हाणून पाडला व तिघांना रंगेहाथ अटक केली.
हॉटेलच्या लॉबिमध्ये हॉटेल विकण्याबाबत वाटाघाटी सुरू असतानाच चेन्नई पोलिसांनी त्यांना बेड्या घातल्या. करुणाकरण (वय-७०), परमानंधम(वय-५५) आणि दक्षिणामूर्ती(वय-६०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. -
सोमवारी वडपलनी येथील 'हॉटेल अंबिका एंपायर'च्या (Hotel Ambica Empire)लॉबिमध्ये बसून तेच हॉटेल विकण्याबाबत वाटाघाटी सुरू असताना त्यांना अटक करण्यात आली.
-
आरोपींनी खरेदीदारांकडून हॉटेलसाठी तब्बल १६५ कोटी रुपयांची मागणी केली होती.
-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी केरळच्या एका खासगी फर्मला संपर्क साधून हॉटेलचे मालक असल्याचे सांगितले आणि कर्ज फेडण्यासाठी हॉटेल विक्रीला काढल्याचे कारण दिले.
-
त्यानंतर खरेदीसाठी खासगी फर्मचे काही माणसे हॉटेलमध्ये आली. खरेदीदारांसाठी आरोपींनी हॉटेलमधीलच एक स्पेशल रुम बुक केली.
खरेदीदारांना संपूर्ण हॉटेल फिरवण्यात आलं, हॉटेलच्या सगळ्या खर्चाची, तेथील कर्मचाऱ्यांची इ. सर्व माहिती देण्यात आली. -
पण, त्यांच्यातील हे संभाषण हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने ऐकलं आणि हॉटेलच्या मॅनेजरला सतर्क केलं.
-
मॅनेजरने तातडीने वडपलनी पोलिसांना संपर्क साधला.
-
तातडीने पोलिसांनी हॉटेलमध्ये धाव घेतली आणि तिघांना खोट्या कागदपत्रांसह रंगेहाथ अटक करण्यात आली.
-
पोलिसांनी त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 420, 419 आणि 511 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
-
-
एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे घडलेली ही घटना बरीच चर्चेत आहे.

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली