-
केवळ १० रुपये देऊन तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक बाईक चालवता येणार आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य : yulu.bike)
-
शुक्रवारी(दि.३१), एमएमआरडीए आणि Yulu Bikes यांच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला असून, पुढील १० दिवसांत ई-बाईक सुविधा सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे.
यानुसार तुम्ही जर मुंबईच्या बांद्रा-कुर्ला परिसरात राहत असाल किंवा प्रवास करत असाल तर तुम्हाला अवघ्या १० रुपयात इलेक्ट्रिक बाईक मिळू शकते. युलु बाइक्सची ही सेवा २४ तास उपलब्ध असेल. या प्रकल्पाबाबत एमएमआरडीए आणि युलु यांच्यामध्ये तीन वर्षांसाठी सामंजस्य करार झाल्याची माहिती एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. -
MMRDA च्या आगामी प्रकल्पानुसार बांद्रा आणि कुर्ला स्टेशन परिसरात २५ ते ३० ई-बाईक्स ठेवण्यात येणार आहेत. या बाईक्स लॉक असतील. त्या अनलॉक करण्यासाठी युलू अॅप डाऊनलोड करावे लागेल.
-
बाईक अनलॉक करण्यासाठी तुम्हाला १० रुपये शूल्क द्यावे लागेल. त्यानंतर बाईकवरचा QR कोड स्कॅन केल्यानंतर बाईक अनलॉक होईल. नंतर प्रत्येक १० मिनिटांसाठी १० रुपये या हिशेबाने बाईक वापरण्याचं भाडं आकारलं जाईल.
-
सध्या या सेवेची भाडे रचना प्राथमिक स्वरूपाची असून, या सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत त्यामध्ये बदल केला जाईल. ही सुविधा अॅपद्वारे उपलब्ध करण्यात आली असून अॅपवरूनच ई-बाइक स्थानकातून घेण्याची सुविधा असेल. या सेवेसाठी सुरुवातीला २५० रु. सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागेल. त्यानंतर युलु स्थानकावरून ई-बाइक घेताना १० रु. शुल्क आकारले जाईल आणि बाइक जमा केल्यावर अॅपमधूनच, प्रत्येक १० मिनिटांसाठी रु. १० याप्रमाणे भाड्याची रक्कम कापली जाईल.
-
सुरुवात २५ ते ३० बाईक्सपासून होणार असली तरी ही संख्या ५०० बाईकपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या बाइक संपूर्ण बीकेसी भागात २५ ठिकाणी उपलब्ध असतील. या ई-बाईकचा अजून एक फायदा म्हणजे तुमच्याकडे लायसन्स असण्याची गरज नाही.
फर्स्ट आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पाबाबत एमएमआरडीए आणि युलु यांच्यामध्ये तीन वर्षांसाठी सामंजस्य करार झाल्याची माहिती एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. -
सामंजस्य करारानुसार एमएमआरडीएतर्फे ई-बाइक स्थानकांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे, तर युलुतर्फे बाइक आणि स्थानकांचे व्यवस्थापन पाहण्यात येईल.
ई-बाइक स्थानकावरून घेताना उपलब्ध बॅटरीनुसार किती किमी अंतर कापले जाऊ शकते याची माहितीही अॅपवर उपलब्ध असेल. बॅटरी पूर्ण चार्ज असताना ५५ किमी अंतर कापेल. -
सध्या या सेवेसाठी, कुर्ला स्थानक पश्चिम, वांद्रे स्थानक पूर्व तसेच वांद्रे-कुर्ला संकुलात ही स्थानके असतील.
-
या सेवेमुळे ट्रॅफिक आणि प्रदूषणाला चांगलाच आळा बसेल.
-
बाईक वापरून झाल्यावर ती पुन्हा जवळच्या स्टेशनवर लॉक केली की काम संपलं.
-
युलु अॅपवर आजूबाजूच्या परिसरात ई-बाईक स्टेशन्स कुठे आहेत हे दाखवणारा नकाशा उपलब्ध असेल.
-
युलु झोनच्या बाहेर ई-बाइक नेल्यास ती जमा करताना मात्र पुन्हा ई-बाइक स्थानकच गाठावे लागेल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”