तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा प्रेमाचा सप्ताह (व्हॅलेंटाइन वीक) आजपासून सुरू होत आहे. व्हॅलेंटाइन वीकचे औचित्य साधत बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाकिब अल हसन आणि त्याची पत्नी उम्मी अहमद शिशिर या लव्हबर्डबद्दल माहिती सांगणार आहे. बांगलादेशचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि उम्मी अहमद शिशिर यांच्यामध्ये २०१० पासून प्रेमाचा अंकुर फुलला. -
दोन वर्ष एकमेंकाना डेट करत होते
दोन वर्ष डेट केल्यानंतर शाकिब आणि उम्मी लग्नाच्या बेडीत अडकले. -
२०१२ मध्ये ढाका येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शाकिब आणि उम्मी लग्नाच्या बेडीत अडकले. यावेळी बांगलादेश संघातील काही खेळाडू उपस्थित होते.
इंग्लंडमध्ये एका पार्टीदरम्यान शाकीब आणि उम्मी यांची भेट झाली होती. शाकीब त्यावेळी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत होता. पार्टीमध्ये भेटल्यानंतर शाकीब आणि उम्मी यांच्यामध्ये मैत्री झाली. -
मैत्री झाल्यानंतर दोघेही आपला वेळातील वेळ काढून भेटू लागले.
-
शाकीब आणि उम्मी यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.
दोन वर्षानंतर लव्हबर्ड लग्नाच्या बेडीत अडकलं. उम्मीचं अमेरिकामधील मिनेसोटामध्ये शिक्षण झालं आहे. -
उम्मीला पाच भाऊ आणि एक बहिण आहे.
उम्मी घरांमध्ये सर्वात छोटी आहे. उम्मी दहा वर्षाची असताना आई-बाबा बांगलादेशमधून अमेरिकेत गेले होते. शाकीब आणि उम्मी यांनी आपल्या घरच्यांच्या सहमतीनं लग्न केलं. या दोघांना एक गोंडस मुलगी आहे. उम्मीला फिरायला खूप आवडते -
बांगलादेश संघासोबत अनेकवेळा उम्मीला पाहण्यात आलं आहे.
-
उम्मीने बांगलेदेशमधील काही प्रॉडक्टसाठी मॉडेलिंगही केली आहे.
शाकीब आयपीएलमध्ये खेळत आहे. मीरपूर येथे भारताविरोधातील एका सामन्यादरम्यान स्टेडियमच्या गॅलरीमध्ये उम्मीसोबत छेडछाड झाली होती. त्यावेळी शाकीबच्या बॉडीगार्डने त्या मुलाला धू धू धुतले होते. -
पत्नीशी छेडछाड झाल्यानंतर शाकीबला राग आनावर आला होता.
शाकीब सध्या जागतिक क्रिकेटमध्ये आघाडीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. शाकीब पत्नीबाबतच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना नेहमी दिसून येतो. -
उम्मी शाहरूख खानची खूप मोठी चाहती आहे. आयपीएलच्या सामन्यादरम्यान तिने शाहरूखची भेट घेतली होती
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ