-
तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा प्रेमाचा सप्ताह (व्हॅलेंटाइन वीक) आजपासून सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय.
-
१४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’पूर्वीचा हा आठवडा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि Rose Day ‘रोझ डे’ने त्याची सुरुवात होते
-
प्रेमाचं प्रतिक असलेला गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. या निमित्ताने राशीनुसार तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकराला कोणत्या रंगाचा गुलाब दिल्यास फायदेशीर ठरेल, हे जाणून घेऊयात.
मेष- या राशीवर मंगळचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे त्यांना लाल रंगाचा गुलाब देणं फायदेशीर ठरेल. वृषभ- या राशीच्या व्यक्तींवर शुक्राचा प्रभाव असल्याने त्यांना गुलाबी रंगाचा गुलाब देणं योग्य ठरेल. मिथुन- या राशीच्या व्यक्तींवर बुधचा प्रभाव अधिक असल्याने त्यांना आकर्षक गुलाबाची फुलं म्हणजेच लाल किंवा इतर गडद रंगाची फुलं भेट म्हणून द्यावीत. कर्क- कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असल्याने त्यांना पांढरा गुलाब देणं फायदेशीर ठरेल. सिंह- या राशीच्या व्यक्तींवर सूर्याचा प्रभाव अधिक असल्याने लाल किंवा पांढरा गुलाब त्यांना दिल्यास ते प्रभावित होऊ शकतात. कन्या- या राशीच्या व्यक्तींना पोपटी किंवा गुलाबी रंगाचे गुलाबाचे फूल देणं योग्य ठरेल. तुळ- या राशीच्या व्यक्तींनाही गुलाबी रंगाचा गुलाब प्रभावित करू शकतो. वृश्चिक- मंगळचा प्रभाव या राशीच्या व्यक्तींवर असल्याने त्यांना लाल किंवा पांढरा गुलाब द्यावा. धनु- या राशीच्या व्यक्तींना पिवळा रंगाचा गुलाब आकर्षित करू शकतो. मकर- निळ्या रंगाचा गुलाब मकर राशीच्या व्यक्तींना दिल्यास ते प्रभावित होऊ शकतात. कुंभ- या राशीच्या व्यक्तींवर शनीचा प्रभाव जास्त असल्याने त्यांना निळा गुलाब देणं फायदेशीर ठरेल. मीन- या राशीच्या व्यक्तींना पिवळा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ