पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मनसेच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाषण करत केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला. घुसखोरांविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला. "देशात आता सफाई करण्याची वेळ आली आहे. आता तर नायजेरियनही येऊ लागलेे आहेत. उद्या हेच तुमच्यावर हात उचलतील. बाहेरून आलेल्या लोकांनामुळे बॉम्बस्फोट, दंगली होत आहे. मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाही," असं राज ठाकरे म्हणाले. "जो देशात राहणाऱ्या माणसांना बाहेर काढले जाणार नाही. इथला आदिवासी इथेच राहणार आहे. मोर्चे काढणाऱ्यांनी आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्यानं राहावं. नाहीतर इथून पुढे दगडाला दगडानं आणि तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ," असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला. "देशात सीएए, एनआरसीवरून गोंधळ सुरू आहे. पण, केंद्र सरकारलाही विचारणार आहे. देशात सध्या जी आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. ती अराजकता लपवण्यासाठी हा कायदा करत आहात का? हे आधी स्पष्ट करावं," असंही राज ठाकरे म्हणाले. "पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूवर अत्याचार होत आहेत. पाकिस्तानातील मुस्लिमांना भारतात नागरिकत्व देण्याची काय गरज? माझा देश धर्मशाळा आहे का? माणुसकीचा भारतानं घेतलेला नाही?," असं ठाकरे म्हणाले. "आपल्या देशात उजवा किंवा डावा इतकंच सुरू आहे. जे चांगलं त्याला चांगलं म्हणालो. जे वाईट होतं त्याच्यावर टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयावर मी टीका केली, त्यावेळी मला भाजपा विरोधक ठरवण्यात आलं. आता भाजपाचं समर्थक ठरवलं जात आहे," असं राज ठाकरे म्हणाले. "सीएए आणि एनआरसीवरून देशभरात मुस्लिमांनी मोर्चे काढले. मला या मोर्चांचा अर्थच लागत नाही. देशातील मुस्लिमांना कोण हाकलणार आहे. कायद्याबद्दल माहिती नसणारेही कसे बोलत आहे?," असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. -
मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसी असेल जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढत होतं. तसं कायद्यातच नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत असा सवाल राज ठाकरे यांनी मोर्चा काढणाऱ्यांना यावेळी विचारला.
आझाद मैदानात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात. "काही जण मला म्हणत होते की, ११.५५ मिनिटांनी येणार आहे? मी त्यांना बोललो मी काय ट्रेन आहे का वेळेवर यायला? वेळ लागतो," अशी उत्तर राज ठाकरे यांनी टीकाकारांना दिलं. -
निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चाच्या ठिकाणी जाण्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे याही त्यांच्यासोबत होत्या.
पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना देशातून बाहेर काढण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबाद, पुण्यासह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. -
पाकिस्तान व बांगलादेशातील घुसखोरांना देशातून बाहेर काढण्याच्या मागणीसाठी मनसेनं काढलेल्या मोर्चामुळे हिंदू जिमखाना ते आझाद मैदान मार्ग भगवामय होऊन गेला होता
हिंदू जिमखाना येथून निघणारा मनसेच्या मोर्चाचा आझाद मैदानात समारोप होणार होता. याठिकाणी राज ठाकरे मोर्चाला मार्गदर्शन करणार होते. यासाठी आझाद मैदानात व्यासपीठ असं उभारण्यात आलं होतं. -
मोर्चाला पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (छायाचित्र सौजन्य : Nirmal Harindran)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली