-
Mahindra and Mahindra कंपनीने पाच फेब्रुवारीपासून ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपो 2020 मध्ये एकाहून एक शानदार गाड्या सादर केल्या आहेत. ((सर्व छायाचित्र सौजन्य – ट्विटर आणि @AEMotorShow))
-
कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार e-KUV100 च्या लाँचिंगसोबतच इलेक्ट्रिक एसयुव्ही e-XUV300 आणि अनेक कॉन्सेप्ट कार सादर केल्या. पण, या सर्व गाड्यांमध्ये सर्वांचं सर्वाधिक लक्ष वेधणारी कार ठरली ती म्हणजे Mahindra Funster.
वरच्या बाजूला उघडणाऱ्या दरवाजांमुळे( Butterfly Door) ही कार इतरांपेक्षा बरीच वेगळी आणि अत्यंत आकर्षक ठरते. -
ही एक कन्व्हर्टेबल रोड्स्टर इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार आहे. या कारला तुम्ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारही बोलू शकतात.
-
वेगाच्या बाबतीत ही कार अफलातून आहे.
या कारचा टॉप स्पीड 200 किलोमीटर प्रतितास इतका आहे. -
Mahindra Funster ही वेगवान कार अवघ्या पाच सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडते.
-
लांब पल्ल्याचं अंतर कापण्याची क्षमताही Mahindra Funster या कारमध्ये आहे.
-
एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 520 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
-
कारमध्ये चार जण बसण्याची क्षमता आहे.
-
कारच्या इंटेरिअरमध्ये मोठी इन्फोटेन्मेंट स्क्रीन आणि डिजिटल इंस्ट्रुमेंट कल्स्टर असून स्टिअरिंगही स्पोर्ट्स कारप्रमाणेच आहे.
-
महिंद्राच्या या कारमध्ये Range Rover च्या Evoque ची झलक पाहायला मिळते. इवोकमध्ये केवळ Butterfly Door दिलेले नाहीत.
-
Mahindra Funster या कारमध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर आणि AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) सिस्टिम आहे.
-
पावरच्या बाबतीतही Funster ही कार दमदार असून 313 हॉर्स पावरची ऊर्जा निर्माण करते.
-
कारचं फ्रंट लुक शार्प आहे, तर फ्लोटिंग टेल लँप्स, स्पोर्ट्स शू इंस्पायर्ड व्हील आर्क्स आणि स्पोर्टी इंटेरिअर आहे.
-
Mahindra Funster च्या साइड प्रोफाइलवर बोल्ड कॅरेक्टर लाइन्स आहे. ती कारच्या मागच्या भागापर्यंत जाते. यावर एक लाइटबार दिला आहे.
-
महिंद्राच्या फन्सेटर इलेक्ट्रिक कंसेप्ट कारला Mahindra Funster Electric Concept कारला ऑटो एक्स्पोमध्ये पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती.
Funster ही कार महिंद्राच्या MESMA प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. -
पाच फेब्रुवारीपासून ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपोची १२ तारखेला सांगता होणार आहे.
-
आतापर्यंत ऑटो एक्सपो 2020 मध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या Concept कार सादर केल्या, पण सर्वाधिक चर्चा राहिली ती म्हणजे महिंद्राच्या Funster चीच.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – ट्विटर आणि @AEMotorShow)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…