-
दक्षिण कोरियाची ख्यातनाम कंपनी Kia Motors ने गेल्याच वर्षी भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये आपली Seltos ही पहिली SUV लाँच करुन दमदार पदार्पण केले. ग्राहकांमध्ये Seltos बाबत प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून जानेवारी २०२० मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या एसयुव्ही गाड्यांच्या क्रमवारीत Seltos अव्वल ठरली आहे. तर, जानेवारी २०२० मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या सर्व कारच्या क्रमवारीत मारुतीने आपला दबदबा कायम ठेवलाय. टॉप २५ गाड्यांच्या या क्रमवारीत एकट्या मारुतीच्या १० गाड्यांचा समावेश आहे. तर, सेल्टॉसनेही या यादीत टॉप १० मध्ये स्थान मिळवून मोठी झेप घेतलीये. जाणून घेऊया गेल्या महिन्यात देशातील सर्वाधिक विक्री झालेल्या पहिल्या २५ कार कोणत्या –
-
Mahindra XUV300 : सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 25 व्या क्रमांकावर महिंद्रा XUV300 आहे. यावर्षी जानेवारी 2020 मध्ये 3,360 महिंद्रा XUV300 विकल्या गेल्या.
-
Tata Nexon या यादीत २४ व्या क्रमांकावर असून या गाडीच्या विक्रीमध्ये 33.62 टक्के घट झालीये. जानेवारी २०२० मध्ये 3 हजार 382 नेक्सनची विक्री झाली. तर, गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा 5 हजार 95 युनिट होता.
-
Hyundai Santro च्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. जानेवारी 2019 मध्ये सँट्रोच्या 8,000 युनिट्सची विक्री झाली होती, तर यावर्षी जानेवारी महिन्यात केवळ 3 हजार 671 युनिट्स विकले गेले. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार २३ व्या क्रमांकावर आहे.
-
Ford EcoSport या यादीमध्ये २२ व्या क्रमांकावर असून जानेवारी 2020 मध्ये 3 हजार 852 गाड्यांची विक्री झाली. जानेवारी 2019 मध्ये हा आकडा 4,510 युनिट होता.
-
Renault Triber सब-कॉम्पैक्ट सेगमेंटमध्ये ही कार लोकप्रिय ठरतेय. 6-7सीटर रेनो ट्राइबरच्या 4 हजार 119 युनिट्सची विक्री जानेवारी २०२० महिन्यात झाली. यासोबतच ही कार २१ व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार २१ व्या क्रमांकावर आहे.
Tata Tiago या कारच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाली असून गेल्या महिन्यात केवळ 4,313 युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा 8,041 होता. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार २० व्या क्रमांकावर आहे. Tata Altroz या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील कारच्या 4,505 युनिट्सची विक्री जानेवारी 2020 मध्ये झाली. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार १९ व्या क्रमांकावर आहे. -
Maruti Ertiga च्या विक्रीतही 21.33 टक्के घट झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये केवळ 4,997 युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षी हा आकडा 6,352 युनिट होता. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार १८ व्या क्रमांकावर आहे.
-
Mahindra Scorpio जानेवारी 2020 मध्ये 5,316 स्कॉर्पियो गाड्यांची विक्री झाली, हा आकडा गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात 4,882 युनिट होता. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार १७ व्या क्रमांकावर आहे.
-
Maruti Celerio च्या विक्रीत 32.34 टक्के घट झाली आहे. जानेवारी 2019 मध्ये या गाडीच्या 9,217 युनिटची विक्री झाली होती. तर आता जानेवारी 2020 मध्ये केवळ 6,236 युनिट्सची विक्री झाली. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार १६ व्या क्रमांकावर आहे.
-
-Hyundai Xcent / Aura च्या विक्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात या गाडीच्या केवळ 2,121 युनिटची विक्री झाली होती. पण यावर्षी जानेवारी महिन्यात हू संख्या वाढून 6691 युनिट्स झाली आहे. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार १५ व्या क्रमांकावर आहे.
-
Hyundai Venue या गाडीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 6,733 युनिट्सच्या विक्रीसह ही कार १४ व्या क्रमांकावर आहे.
-
-Hyundai Creta च्या विक्रीत मात्र 33.10 टक्के घट झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये या गाडीच्या 6,900 युनिट्सची विक्री झाली, तर जानेवारी 2019 मध्ये ही संख्या तब्बल 10,314 युनिट होती. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार १३ व्या क्रमांकावर आहे.
-
Maruti S-Presso गेल्या वर्षी लाँच झालेल्या या एंट्री लेवल मिनी एमपीवी कारच्या 6,971 युनिट्सची विक्री जानेवारी २०२० मध्ये झाली. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार १२ व्या क्रमांकावर आहे.
-
महिंद्रा बोलेरोच्या विक्रीत थोडीफार घट झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये बोलेरोच्या 7,233 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी हा आकडा 7998 युनिट होता. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार ११ व्या क्रमांकावर आहे.
-
Hyundai i20 या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील कारच्या 8,137 युनिट्सची विक्री जानेवारी 2020 मध्ये झाली, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा 11,749 युनिट होता. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार १० व्या क्रमांकावर आहे.
-
Hyundai Grand i10 च्या जानेवारी 2020 मध्ये 8,774 युनिट्सची विक्री झाली, तर जानेवारी 2019 मध्ये 10,285 युनिट्सची विक्री झाली होती. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार ९ व्या क्रमांकावर आहे.
-
Maruti Brezza ही सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील कार आठव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 10,134 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा 13,172 युनिट होता. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार ८ व्या क्रमांकावर आहे.
Maruti Eeco ही कार बीएस6 इंजिनमध्ये अपडेट केल्यापासून विक्रीमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये या कारच्या 12,324 युनिट्सची विक्री झाली आहे, तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 9,063 युनिट्सची विक्री झाली होती. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार ७ व्या क्रमांकावर आहे. Kia Seltos गेल्या वर्षीच भारतीय बाजारात एंट्री करणाऱ्या Kia ची Seltos ही कार चांगलीच लोकप्रिय ठरतेय. जानेवारी 2020 मध्ये या कारच्या तब्बल 15,000 युनिट्सची विक्री झाली. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये ही कार ६ व्या क्रमांकावर आहे. तर सर्वाधिक विक्री झालेल्या एसयुव्ही गाड्यांमध्ये सेल्टॉस अव्वल ठरलीये. -
Maruti WagonR ही कार यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2019 मध्ये 10,038 WagonR विकल्या होत्या, तर यावर्षी जानेवारीमध्ये आकडा वाढून 15 हजार 232 झाला आहे.
Maruti Alto या कारच्या विक्रीत घट झाली आहे. जानेवरी 2020 मध्ये या कारच्या एकूण 18 हजार 914 युनिट्सची विक्री झाली. जानेवारी 2019 मध्ये हा आकडा 23 हजार 360 युनिट्स होता. Maruti Swift ही कार यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून जानेवारी २०२० मध्ये 19,981 युनिट्सची विक्री झाली, तर जानेवारी 2019 मध्ये 18,795 युनिट्सची विक्री झाली होती. -
Maruti Baleno या प्रीमियम हॅचबॅक कारच्या तबब्ल 20,485 युनिट्सची विक्री जानेवारी 2020 मध्ये झाली. तर जानेवारी 2019 मध्ये हा आकडा 16,717 युनिट होता.
-
अपेक्षेप्रमाणे Maruti Dzire अव्वल कार ठरली. जानेवारी 2020 मध्ये एकूण 22 हजार 406 Dzire ची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 19 हजार 73 गाड्यांची विक्री झाली होती.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”