-
Vodafone च्या ग्राहकांसाठी कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. बिल पेमेंट्स केल्यास कंपनीकडून ग्राहकांना दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर प्रीपेड ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे. पुढच्या दहा स्टेप्समध्ये जाणून घेऊया काय आहे ऑफर आणि कसा मिळवाल लाभ –
एका ग्राहकाला एकदाच या ऑफरचा लाभ घेता येईल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. या ऑफरसाठी व्होडाफोनने इ-वॉलेट कंपनी Paytm सोबत भागीदारी केली आहे. -
-
ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच असेल असं पेटीएमने स्पष्ट केलं आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना किमान 149 रुपयांचं रिचार्ज करणं आवश्यक असेल.
ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पेमेंट करतेवेळी नव्या पेटीएम ग्राहकांना VODANEW2500 या प्रोमोकोडचा वापर करावा लागेल. तर आधीपासूनच पेटीएम वापरत असलेल्या ग्राहकांना VODA2500 प्रोमो कोडचा वापर करावा लागेल. या प्रोमोकोडचा वापर करुन व्यवहार पूर्ण केल्यानंतर ग्राहकांना लगेचच 15 रुपये कॅशबॅक मिळतील. नंतर, पेटीएमकडून 24 तासांच्या आत तुम्हाला उर्वरित 2,485 रुपयांचा रिवॉर्ड मिळेल. -
या रिवॉर्डमध्ये Paytm Movie, Flight, Paytm First आणि Bus तिकिट पेटीएम व्हाउचरचा समावेश आहे.
Paytm च्या नव्या आणि जुन्या ग्राहकांसाठी ऑफरमध्ये थोडाफार फरक आहे. Paytm च्या नव्या ग्राहकांना 30 रुपये कॅशबॅक मिळेल, तर पेटीएमच्या जुन्या ग्राहकांना 15 रुपये कॅशबॅक आहे. इतर सर्व ऑफर सारख्याच आहेत.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”