-
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकहाती विजय मिळवताना ७० जागांपैकी तब्बल ६२ जागा जिंकल्या, तर केवळ आठ जागा भाजपाच्या खात्यात गेल्या. या ६२ जागांपैकी एक जागा म्हणजे जंगपुरा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून प्रवीणकुमार देशमुख हे आमदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. १६ हजार ६३ मतांनी त्यांनी विजय मिळवला.
-
प्रवीणकुमार देशमुख हे नाव मराठी आहे, पण ते मूळचे मध्य प्रदेशातील बैतूल येथील आथनेर या छोट्या गावातील रहिवासी आहेत.
-
भोपाळमधून शिक्षण पूर्ण करणारे प्रवीणकुमार एका सामान्य कुटुंबातून येतात, त्यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी काहीच संबंध नव्हता.
-
प्रवीणकुमार यांचे वडील पी.एन. देशमुख आजही भोपाळमध्ये पंक्चरचं दुकान चालवतात.
यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रवीणकुमार देशमुख आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, वडील पी.एन. देशमुख कोणताही गर्व न बाळगता पंक्चर काढण्याचं काम करतात. -
एमबीएचं शिक्षण घेतलेल्या प्रवीण यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात २०११ मध्ये झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला प्रभावित होऊन झाली.
-
त्यानंतर त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. २००८ मध्ये भोपाळमधून एमबीएचं शिक्षण घेतलेल्या प्रवीणकुमार यांना २००९ मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी दिल्लीमध्ये यावं लागलं.
-
त्यांच्या कुटुंबियांनी कधी विचार केला नव्हता की त्यांचा मुलगा नोकरी सोडून राजकारणाकडे वळेल. पण, अण्णा आंदोलनानंतर प्रवीणकुमार यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश केला.
प्रवीणकुमार यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि जवळपास 20 हजार मतांनी ते विजयी झाले होते. -
भोपाळमध्ये त्यांच्या वडिलाचं ज्योती टायर वर्क्स नावाचं पंक्चरचं दुकान आहे. प्रवीणकुमार पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावरही त्याच्या वडिलांनी आपलं काम सोडलं नव्हतं.
त्यावेळी त्यांच्या दुकानाबाहेर माध्यमांची मोठी गर्दी झाली होती. तेव्हा, 'मी माझं काम सोडणार नाही' असं त्यांचे वडील म्हणाले होते. प्रवीणकुमार यांनी अनेकदा वडिलांना काम सोडण्यास सांगितलं. पण, 'मला माझं काम आवडतं, या कामात मला आनंद मिळतो' असं ते म्हणतात. २०२० मध्ये आपने प्रवीणकुमार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि त्यांना दुसऱ्यांदा जंगपुरा येथून उमेदवारी दिली. -
यावेळीही पक्षाच्या अपेक्षांवर प्रवीणकुमार खरे उतरले आणि दुसऱ्यांदा विजय मिळवला.
-
प्रवीणकुमार यांच्या विजयात यावेळेस त्यांच्या मित्रांचा फार मोठा हात होता. दिल्लीमध्ये ठाण मांडून त्यांनी प्रवीण यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली.
आपने त्यांना दिल्ली प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही दिली होती. -
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
विजयी घोषीत झाल्यानंतरचेस छायाचित्र
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
मतमोजणीआधी मतमोजणीकेंद्राबाहेर इव्हीएम सुरक्षेसाठी रात्रभर पहारा देतानाचे छायाचित्र
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो
-
निवडणूक प्रचारादरम्यानचे प्रवीणकुमार देशमुख यांचे फोटो

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित