-
पुणे म्हटल्यावर सर्वात आधी आठवतात ते पुणेरी पाट्या. थेट टोमणा मारणाऱ्या आणि खोचक सल्ले देणाऱ्या पुणेरी पाट्या आत इंटरनेटमुळे अगदी जगप्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र आत पुण्यात बेनामी होर्डिंग्ज लावण्याचाही ट्रेण्ड येऊ लागलाय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे पुण्यात पुन्हा झळकलेली 'सविता भाभी… तू तिथंच थांब!!' नावाने लागलेली बेनामी होर्डिंग्स.
-
पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये 'सविता भाभी… तू तिथंच थांब!!' असा मजकूर असणारी होर्डिंग्स लागली आहेत.
-
या होर्डिंग्सवर केवळ 'सविता भाभी… तू तिथंच थांब!!' इतकचं लिहलं असून ते कोणी आणि का लावले आहे याबद्दल शहरामध्ये चर्चा सुरु झाली आहे.
-
पुण्यातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये 'सविता भाभी… तू तिथंच थांब!!' हे होर्डिंग्स लागलेले दिसत आहे.
-
अशाप्रकारे पुण्यामध्ये बेनामी होर्डिंग्स लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
-
याआधी पुण्यामध्ये २०१८ साली नोव्हेंबर महिन्यामध्ये 'दादा, मी प्रेग्नंट आहे' असे होर्डिंग्स लागले होते. त्यानंतर काही दिवसांनी हे एका नाटकाचे प्रमोशन असल्याचे स्पष्ट झालं होतं.
-
यावेळीही अनेक ठिकाणी ही बेनामी होर्डिंग्स लागली आहेत.
-
शहरभर लागलेल्या या होर्डिंग्स मागे कोणाचं डोकं आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
-
अनेक प्रमुख ठिकाणी मोठ्या आकाराची होर्डिंग्स पुणेकरांची लक्ष्य वेधून घेत आहेत.
-
या होर्डिंग्सची शहरामध्ये चांगलीच चर्चा आहे.
-
मात्र आता हे 'सविता भाभी… तू तिथंच थांब!!' काय प्रकरण आहे? ही होर्डिंग्स कोणी आणि का लावली याचा उलगडा येत्या काही दिवसात होईल.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ