-
भारताचे राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर रामनाथ कोविंद यांनी लोणावळयात आयएनएस शिवाजी या भारतीय नौदलाच्या तळाला राष्ट्रपतीच्या रंगाने सम्मानित केले. (सर्व फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देण्यात आली.
-
या खास प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोशियारी सुद्धा उपस्थित होते.
-
आयएनएस शिवाजी येथे भारतीय नौदलाचे इंजिनिअरींग कॉलेज आहे.
-
भारतीय नौदलाचे आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना इथे प्रशिक्षण दिले जाते.
-
आयएनएस शिवाजी भुशी डॅमजवळ असून, ८७६ एकरमध्ये हा नौदल तळ पसरलेला आहे.
-
आयएनएस शिवाजीवर आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त नौसैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-
आयएनएस शिवाजीवर शिकवल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची मान्यता आहे.
-
समुद्रात असताना आपतकालीन स्थितीत युद्धनौकेचे नुकसान रोखण्यासाठी काय करावे लागते, यासंबंधीचे प्रशिक्षण आयएनएस शिवाजीवर दिले जाते.
-
हा कार्यक्रम पाहण्यासाठी आयएनएस शिवाजीवर उपस्थित असलेले नौसैनिकांचे कुटुंबिय.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ