-
देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये Jimny SUV ची पहिली झलक दाखवली आणि ग्राहकांमध्ये एका चर्चेला उधाण आले आहे. ही एसयुव्ही मारुतीच्या लोकप्रिय Gypsy ची जागा घेणार अशी जोरदार चर्चा सुरूये. (सर्व छायाचित्र सौजन्य ट्विटर, @SirishChandran आणि @AEMotorShow)
-
ऑटो एक्स्पोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान हिलाही या भारदस्त गाडीमध्ये बसण्याचा मोह आवरता आला नाही.
-
ग्लोबल मार्केटमध्ये दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली ही SUV भारतात मात्र अद्याप लाँच करण्यात आलेली नाही.
-
मारुतीने गेल्यावर्षीच भारतातील आपल्या लोकप्रिय Maruti Gypsy गाडीचं प्रोडक्शन थांबवलंय, त्यामुळे कंपनी Gypsy च्या ऐवजी Jimny लाँच करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
अशातच कंपनीकडून ही एसयुव्ही ऑटो एक्सपो 2020 मध्ये अर्थात भारतात पहिल्यांदाच सादर करण्यात आल्यामुळे लवकरच ही गाडी जिप्सीची जागा घेईल अशाप्रकारच्या चर्चांना उधाण आलंय.
सुझुकी जिम्नी सिएरा कॉन्सेप्ट एसयुव्ही म्हणजे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मिनी एसयुव्हीचे वाइड-बॉडी (रुंद) व्हर्जन आहे. -
सुझुकी जिम्नी ऑफ-रोड एसयुव्ही आहे, त्यामुळे या कारला जास्त ग्राउंड क्लिअरंस आहे.
जिम्नी सिएरा व्हेरिअंटमध्ये 1.5L K15B पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनद्वारे 100bhp पावर आणि 130Nm टॉर्क निर्माण होते. -
जपानमध्ये उपलब्ध चौथी जनरेशन सुझुकी जिम्नी अत्यंत आकर्षक दिसते. ही लॅडर फ्रेम चेसिसवर आधारित चार-व्हिल ड्राइव एसयुव्ही आहे.
-
पिकअप कॉन्सेप्टमध्ये रेट्रो-स्टाइल वुडन साइड बॉडी पॅनल आणि हनीकॉम्ब स्टाइलमध्ये ग्रिल आहेत.
-
एलईडी स्पॉट-लाइट्स, सिल्वर स्किड प्लेट्स, ब्लॅक लोअर बॉडी क्लॅडिंग, व्हाइट फिनिश्ड रूफ, स्टील व्हिल्स आणि ऑफ रोड टायरमुळे जिम्नी कॉन्सेप्ट ढासू दिसते.
-
राउंड हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प्समुळे एसयुव्हीला शानदार लुक मिळते.
-
जिम्नीमध्ये टचस्क्रीन इन्फोटन्मेंट सिस्टिम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ड्युअल सेंसर ब्रेक सपोर्ट यांसारखे प्रीमियम फीचर्स आहेत.
-
सुझुकी जिम्नी दिसायला मर्सिडीज जी-क्सासप्रमाणे दिसते.
-
राउंड शेप्ड हेडलॅम्पसह फ्लॅट रूफमुळे या कारला रेट्रो लुक येतो. कारची लांबी 3395mm असून 1,475mm रुंद आहे. तसेच व्हिलबेस 2250mm देण्यात आला आहे आणि ग्राउंड क्लिअरंस 205mm आहे.
-
भारतात लाँच झाल्यास या गाडीची किंमत १० लाख रुपयांच्या जवळपास असू शकते.
-
(छायाचित्र सौजन्य – ट्विटर)
-
(छायाचित्र सौजन्य – ट्विटर)
-
(छायाचित्र सौजन्य – ट्विटर)
-
(छायाचित्र सौजन्य – ट्विटर)
-
(छायाचित्र सौजन्य – ट्विटर)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”