-
मुंबईकर, तसेच देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणस्थान बनलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीचा बाग) दोन नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
आधी राणीच्या बागेत सिंहाची जोडी येणार होती. पण, त्यांचं आगमन लांबणीवर गेलं पडलं. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
त्यामुळे औरंगाबाद येथील पालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांची जोडी राणीच्या बागेत आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
राज्य सरकारच्या वाईल्ड लाइन वॉर्डनकडून हिरवा कंदील मिळल्यानंतर औरंगाबाद येथून शक्ती आणि करिश्मा नावाची वाघाची जोडी आणण्यात आली आहे. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
वाघाच्या जोडीच्या बदल्यात औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयाने चितळाच्या दोन जोडय़ा आणि टेंडर स्टॉर्क नामक पक्ष्याच्या दोन जोडय़ांची मागणी केली होती. राणीच्या बागेत चितळ आणि टेंडर स्टॉर्क पक्षी उपलब्ध आहेत. त्यामुळे चितळ आणि टेंडर स्टॉर्क पक्षी देऊन राणीच्या बागेत वाघाची जोडी आणण्यात आली आहे. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
उभय प्राणिसंग्रहालयांतील वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या देवाण-घेवाणीला राज्य सरकारच्या वाईल्ड लाइफ वॉर्डनच्या परवानगीची आवश्यकता असते. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
ही परवानगी मिळावी यासाठी राणीच्या बागेतील प्रशासनाकडून वाईल्ड लाइफ वॉर्डनला पत्रव्यवहार करण्यात आला होता. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
आवश्यक ती परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ औरंगाबाद येथून वाघाची जोडी आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
करिश्मा आणि शक्ती या वाघांची जोडी गुरूवारी राणीच्या बागेत आणण्यात आली. वाघांच्या जोडीला सुरुवातीच्या काळात स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)
-
राणीच्या बागेत रुळल्यानंतर म्हणजे साधारण मेच्या दरम्यान वाघांचे दर्शन पर्यटकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी राणीच्या बागेतील ही वाघाची जोडी आकर्षण ठरणार आहे. (एक्स्प्रेस फोटो : निर्मल हरिंद्रन)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ