-
मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. (सर्व फोटो- निर्मल हरिनंदन)
-
जीएसटी भवनाला लागलेली ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे २० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
जीएसटी भवनाला लागलेली आग ही लेव्हल थ्री ची आग लागल्याचं अग्निशमन दलाने म्हटलं आहे. म्हणजेच ही आग गंभीर स्वरुपाची आहे.
-
ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली ते अद्याप समजू शकलेले नाही.
-
वरचे दोन मजले रिकामे होते तिथे नुतनीकरण सुरु होते. त्यामुळे या ठिकाणी कर्मचारी नव्हते. घटनास्थळी धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत.
-
जीएसटी भवनाच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. १०० पेक्षा जास्त कर्मचारी हे आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
-
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केलं.
-
सुदैवाने या आगीत कुणाचाही जीव गेलेला नाही. मात्र कोणत्या कागदपत्रांचं नुकसान झालं आहे, काय वाचलं आहे त्याचा आढावा नंतर घेतला जाईल.
-
ही आग लागल्याचे समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत. "सुरुवातीला आग नियंत्रणात आणण्याचं काम सुरु आहे," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
-
ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”