-
Hero Motocorp ने मंगळवारी आपली नवीन बाइक Hero Xtreme 160R ची झलक दाखवली. ही बाइक कंपनीची पहिली 160cc इंजिनची बाइक आणि Xtreme मालिकेतील तिसरी बाइक ठरलीये.
-
Xtreme मालिकेत कंपनीकडे आधीपासून Xtreme 200R आणि फुल-फेयर्ड Xtreme 200S या बाइक्स आहेत. आता यामध्ये अजून एका बाइकचा समावेश होणार असून Xtreme 160R ची भारतीय बाजारात बजाज पल्सर NS160, सुझुकी जिक्सर आणि टीव्हीएस अपाचे RTR 160 4V यांसारख्या गाड्यांशी स्पर्धा असेल.
फीचर्स कोणते ? या स्पोर्ट्स नेकेड बाइकमध्ये एलईडी हेडलाइट, टेललाइट आणि टर्न इंडिकेटरची सुविधा मिळेल. बाइकमध्ये फुल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर असून कंपनीने या बाइकमध्ये साइड-स्टँड-डाउन इंजिन कट-ऑफ फंक्शन देखील दिले आहेत. -
बाइकमध्ये 17-इंचाचे अॅलॉय व्हिल्स आहेत आणि ग्राउंड क्लिअरन्स 170mm आहे. तर, 138.5 किलो इतकं वजन (कर्ब वेट) या बाइकचं असून फ्रंटमध्ये 37mm टेलेस्कोपिक फोर्क्स आणि रिअरमध्ये 7-स्टेप अॅड्जस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन आहेत.
-
इंजिन : स्पोर्टी आणि आक्रमक दिसणारी Hero Xtreme 160R ही बाइक Xtreme 1R कॉन्सेप्टवर आधारित असून ही कॉन्सेप्ट 2019 मध्ये इटलीच्या मिलान शहरात झालेल्या EICMA 2019 मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती.
-
या बाइकमध्ये BS6-कम्प्लायंट 160cc इंजिन आहे. हे इंजिन 8,000rpm वर 15hp ची ऊर्जा आणि 6,500rpm वर 14Nm पीक टॉर्क निर्माण करते. इंजिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय आहे. ही बाइक 4.7 सेकंदांमध्ये 0 ते 60 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडते, असा दावा कंपनीने केला आहे.
-
ही बाइक 4.7 सेकंदांमध्ये 0 ते 60 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडते, असा दावा कंपनीने केला आहे.
-
ही बाइक दोन व्हेरिअंटमध्ये भारतात उपलब्ध केली जाईल. यात फ्रंट डिस्क आणि ड्युअल डिस्क (फ्रंट व रिअर डिस्क) व्हेरिअंटचा समावेश आहे. दोन्ही व्हेरिअंटमध्ये सिंगल चॅनल एबीएस मिळेल.
-
ग्रे-व्हाइट, ग्रे-ब्लू आणि ग्रे-स्पोर्ट्स रेड अशा तीन रंगांमध्ये ही कार मार्च महिन्यात लाँच केली जाणार आहे. जवळपास 88 हजार रुपये इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत असू शकते.
-
यासोबतच, कंपनीने जयपूरमध्ये सुरू असलेल्या हिरो मोटोकॉर्प वर्ल्ड 2020 मध्ये कंपनीने आपल्या दोन लोकप्रिय बाइक Glamour आणि Passion Pro या बीएस-6 इंजिनमध्ये लाँच केल्या.
-
2020 Hero Glamour 125 ही बाइक चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे. ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन व्हेरिअंटमध्ये नवीन Glamour उपलब्ध असेल.
-
तर, Hero Passion Pro ही बाइकही चार रंगांच्या पर्यांयांसह ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल.
किंमत : नव्या Passion Pro बाइकच्या ड्रम ब्रेक व्हेरिअंटची किंमत 68 हजार 900 रुपये(एक्स-शोरुम ) आणि ड्रम ब्रेक व्हेरिअंटची किंमत 72 हजार 400 रुपये (एक्स-शोरुम) इतकी ठेवण्यात आली आहे. तर, Glamour 125 च्या ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 64 हजार 990 रुपये(एक्स-शोरुम) आणि 67 हजार 190 रुपये (एक्स-शोरुम) इतकी ठेवण्यात आली आहे. -
(Hero Xtreme 160R)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ