काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वडेरा यांनी 18 फेब्रुवारी रोजी आपल्या लग्नाला 23 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर लग्नाचे आणि कुटुंबियांचे काही खास फोटो शेअर केलेत. यासोबतच प्रियंका यांनी एक भावूक पोस्टही शेअर केलीये. प्रियंका यांच्या पोस्टनंतर त्यांचे पती रॉबर्ट वडेरा यांनीही काही फोटो शेअर केले असून त्यांनीही प्रियंकासाठी एक सुंदर संदेश लिहिलाय. प्रियंका गांधी वडेरा यांनी आपल्या लग्नाचे, आई सोनिया गांधी, भाऊ राहुल, पती आणि मुलांचे फोटो शेअर केलेत. या फोटोंसोबत, "देवाकडून आम्हाला लाखो सुंदर क्षण, प्रेम, अश्रू, हास्य, मैत्री, कुटुंब आणि दोन अनमोल रत्न मिळालेत…23 + 6 … 29 वर्ष…अन् कायमस्वरुपी…" असा भावुक संदेश प्रियंका यांनी लिहिला आहे. -
प्रियंका आणि रॉबर्ट वडेरा या दोघांनीही सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सात फेरे घेतले. दोघांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा प्रियंका अवघ्या 13 वर्षाच्या होत्या.
-
एका ओळखीच्या मित्राद्वारे दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. रॉबर्ट यांना प्रियंका यांचा साधेपणा खूप भावला आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.
-
कालांतराने चांगल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रॉबर्ट वडेरा यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत, 'जेव्हा ब्रिटिश शाळेत शिक्षण घेत होतो त्यावेळी प्रियंकाला मी आवडायचो असं मला वाटायचं. तर, माझ्याबाबत प्रियंकाही अशाचप्रकारेच विचार करायची', असा खुलासा केला होता.
-
तर, 13 वर्षांची असताना पहिल्यांदा रॉबर्ट वडेरा यांना भेटले अशी माहिती स्वतः प्रियंका यांनी आउटलुकला दिलेल्या एका मुलाखतीत दिली होती. त्यावेळी रॉबर्ट एका सामान्य माणसाप्रमाणेच प्रियंका यांना भेटले होते, त्यांची हिच खासियत प्रियंका यांनाही आवडली होती.
-
बहुतांश वेळा प्रियकर गुडघ्यावर बसून प्रेयसीला लग्नाची मागणी घालतो, असे तुम्ही ऐकले असेल. पण, वडेरा यांनी याबाबतच्या एका प्रश्चाचं उत्तर देताना 'मी आणि प्रियंकाने एकत्र बसून नातं स्वीकारलं आणि लग्नाचा निर्णय घेतला' असं सांगितलं.
-
प्रियंका आणि रॉबर्ट दोघंही लग्नासाठी तयार होते, पण रॉबर्ट वडेरांचे वडील या लग्नासाठी तयार नव्हते. मात्र, अखेर कालांतराने त्यांचा विरोध मावळला आणि ते लग्नासाठी तयार झाले.
-
प्रियंका आणि रॉबर्ट दोघंही आपल्या नात्याबाबत जास्त चर्चा करत नाहीत. रॉबर्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, खासगी जीवनाबाबत चर्चा करायला आवडत नाही, कारण…
-
'खासगी जीवनाबाबत चर्चा करायला आवडत नाही, कारण लोकं काही गोष्टी समजून घेत नाहीत आणि स्वतःच्या पद्धतीने वेगळंच रुप देतात', असं वडेरा म्हणाले होते.
प्रियंका आणि रॉबर्ट यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राजकारणात सक्रिय सहभागासोबतच प्रियंका मुलांची जबाबदारीही सांभाळतात. -
प्रियंका यांचा जन्म राजकीय कुटुंबात तर रॉबर्ट एका बड्या व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्मलेले आहेत. त्यामुळे दोघांचंही कौटुंबिक वातावरण वेगवेगळं होतं.
-
वडेरा यांचा हँडीक्राफ्ट आयटम्स आणि कस्टम ज्वेलरीचा व्यापार असून 'आर्टेक्स एक्सपोर्ट्स' असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. याशिवाय वडेरा अन्य अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहेत.
''हॅप्पी अॅनिव्हर्सरी P (प्रियंकाच्या नावाचं पहिलं अक्षर) इतक्या वर्षांपासून एकत्र राहिल्याने आपण एकसारखेच झालो आहोत. चांगल्या आणि वाईट काळामुळे आपलं आयुष्य इंटरेस्टिंग झालंय. सुखी, निरोगी जीवनासाठी शुभेच्छा. काहीही झालं तरी पुढच्या काळातही माझी तुझ्यासोबतची साथ कायम असेल,'' असा सुंदर संदेश लिहिला. ''हॅप्पी अॅनिव्हर्सरी P (प्रियंकाच्या नावाचं पहिलं अक्षर) इतक्या वर्षांपासून एकत्र राहिल्याने आपण एकसारखेच झालो आहोत. चांगल्या आणि वाईट काळामुळे आपलं आयुष्य इंटरेस्टिंग झालंय. सुखी, निरोगी जीवनासाठी शुभेच्छा. काहीही झालं तरी पुढच्या काळातही माझी तुझ्यासोबतची साथ कायम असेल,'' असा सुंदर संदेश लिहिला. -
(प्रियंका गांधीनी केलेलं ट्विट)
-
(रॉबर्ट वडेरा यांनी केलेले ट्विट)
-
यानंतर अजून एक ट्विट करत वडेरा यांनी प्रियंकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(प्रियंका गांधींनी ट्विट केलेले फोटो)
-
(प्रियंका गांधींनी ट्विट केलेले फोटो)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”