सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM)ने भारतात जानेवारी 2020 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींची यादी (टॉप 10 बेस्ट सेलर टू-व्हीलर) जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार हीरोची लोकप्रिय बाइक स्प्लेंडरवर मात करत एक नवी गाडी अव्वल ठरली आहे. एक नजर मारुया टॉप 10 सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींवर.. SIAM ने जारी केलेल्या यादीमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 10 व्या क्रमांकावर हीरोची Glamour ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये 40 हजार 318 ग्लॅमरची विक्री झाली. नवव्या क्रमांकावर रॉयल एनफिल्डची लोकप्रिय बुलेट Classic 350 आहे. जानेवारी 2020 मध्ये 40 हजार 834 Classic 350 विकल्या गेल्या. -
सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये आठव्या क्रमांकावर बजाज CT ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये 42 हजार 497 बजाज CT बाइकची विक्री झाली.
-
सातव्या क्रमांकावर TVS XL Super आहे. 52 हजार 525 इतक्या TVS XL Super जानेवारी 2020 मध्ये विकल्या गेल्या.
-
SIAM ने जारी केलेल्या यादीनुसार सहाव्या क्रमांकावर Suzuki Access ही स्कुटी असून जानेवारी महिन्यात या स्कुटीच्या 54 हजार 595 युनिट्सची विक्री झाली.
-
सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये पाचव्या क्रमांकावर होंडाची CB Shine आहे. जानेवारीमध्ये या बाइकच्या 66 हजार 832 युनिट्सची विक्री झाली.
-
चौथ्या क्रमांकावर बजाजची लोकप्रिय बाइक पल्सर आहे. जानेवारीमध्ये 68 हजार 354 पल्सर विकल्या गेल्या.
-
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा हीरोची HF Deluxe ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये HF Deluxe च्या 1 लाख 91 हजार 875 HF Deluxe बाइक विकल्या गेल्या.
-
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हीरोची सर्वाधिक लोकप्रिय Splendor ही बाइक आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात स्प्लेंडर या यादीमध्ये अव्वल क्रमांकावर होती. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 2 लाख 23 हजार 909 स्प्लेंडरची विक्री झाली होती. तर यावेळेस जानेवारीमध्ये 2 लाख 22 हजार 578 स्प्लेंडरची विक्री झाली.
-
सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये होंडाची Activa सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. जानेवारी 2020 मध्ये या लोकप्रिय स्कुटीच्या 2 लाख 34 हजार 749 इतक्या युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 2 लाख 13 हजार 302 Activa विकल्या गेल्या होत्या आणि ही स्कुटी दुसऱ्या क्रमांकावर होती. पण आता स्प्लेंडरला मागे टाकत Activa अव्वल ठरली आहे.
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”