-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अहमदाबाद विमानतळावर उपस्थित होते. मोदींनी गळाभेट घेऊन ट्रम्प यांचे स्वागत केले असले तरी, त्यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले.
-
मोदींनी शिष्टाचाराचे उल्लंघन करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अन्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी मोदींनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले आहे.
-
दोन वर्षांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात आले होते. त्यावेळी सुद्धा मोदींनी विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले होते.
-
१४ जानेवारी २०१८ रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात आले होते. त्यावेळी सुद्धा मोदींनी विमानतळावर जाऊन प्रोटोकॉल मोडून त्यांचे स्वागत केले होते.
-
२५ जानेवारी २०१५ रोजी मोदींनी विमानतळावर जाऊन अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत केले होते. त्यावेळी सुद्धा प्रोटोकॉल मोडला होता.
-
२०१५ साली पंतप्रधान मोदींनी अचानक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानी काही तासांची भेट देऊन सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केले होते. त्यावेळी शरीफ यांचा बर्थ डे तर नातीचे लग्न होते.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबू धाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या स्वागताला उपस्थित राहून प्रोटोकॉल मोडला होता.
-
२५ जून २०१८ रोजी मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भेटण्यासाठी अचानक नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन पोहोचले होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी सुरक्षा प्रोटोकॉल मोडला होता.
-
१५ ऑगस्ट २०१८ रोजी लाल किल्ल्यावर लहान मुलांना भेटण्यासाठी मोदींनी प्रोटोकॉल मोडला होता.
-
६९ व्या प्रजासत्ताकदिनी सुद्धा राजपथावर नागरिकांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सुरक्षा प्रोटोकॉल मोडला होता.
![sandeep baswana on relationship with ashlesha sawant](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/sandeep-baswana-on-relationship-with-ashlesha-sawant.jpg?w=300&h=200&crop=1)
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”