-
सध्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलेला असून मुंबईकरांनीदेखील याचा धसका घेतला आहे. (सर्व फोटो – एक्स्प्रेस फोटो / अमित चक्रवर्ती)
-
करोना हा साथीचा रोग असल्याने त्याची लागण झटपट होऊ शकते हे लक्षात घेता विविध स्तरांवर सावधगिरी बाळगण्यात येत आहे.
-
जगभरात करोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये वाढ होत असून लोकांच्या भेटीगाठी घेताना हात मिळवू नका असा सल्ला देण्यात येत आहे.
-
करोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत असल्याने अत्यंत रोजच्या जीवनात वावरताना सावधानता बाळगण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
-
-
प्रचंड गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिल्यानंतर गर्दीचे शहर ओळखले जाणारे मुंबईदेखील काहीसे हादरले आहे.
-
ऊन-पावसाला न जुमानणारे मुंबईकर 'करोना'पासून बचाव करण्यासाठी मात्र आवश्यक ती काळजी घेत आहेत.
-
हातावर पोट असणाऱ्या मुंबईकरांना रोजची गर्दी टाळणे शक्य नसल्याने धावपळीच्या व्यस्त वेळापत्रकात ते मास्कचा वापर करताना दिसत आहेत.
-
मुंबईत अद्याप करोना आवाक्यात आहे. पण मुंबईकरांनी या रोगाचा धसका घेतला असून तेसुद्धा मास्कला प्राधान्य देत आहेत.
-
करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्येही करोनाची लागण न होण्यासाठी कशी काळजी घ्यावी याची पत्रक लावण्यात आली आहेत.

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी