-
संग्रहित छायाचित्र
-
-
राज्याच्या सीमा चोहोबाजूंनी बंद करण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. हे सगळे निर्णय होत असताना जे घरी होते, ते सुरक्षितपणे त्यांच्या घरट्यात आहेत. पण जे पोहोचले नाही, त्यांचं काय झालं?
-
रेल्वे मंत्रालयानं रविवारी देशभरातील एक्स्प्रेस आणि मुंबईतील लोकल सेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. करोना संशियत आणि होम क्वारंटाइनचा सल्ला दिलेले नागरिक रेल्वेत आढळून आल्यानंतर तातडीनं हा निर्णय घेण्यात आला.
-
हा निर्णय झाला तोपर्यंत हावडा ते मुंबई या दोन शहरांना जोडणारी दुरान्तो एक्स्प्रेस मुंबईत दाखल झाली होती. त्यानंतर ही एक्स्प्रेस परत माघारी फिरलीच नाही.
-
रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाप्रमाणे दुरान्तो एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये उभी आहे. पण, त्यात तब्बल ४७ माणसं घराकडे डोळे लावून बसली आहेत.
-
ही ४७ माणसं दुसरी-तिसरी कुणीही नसून दुरान्तो एक्स्प्रेसमधील कर्मचारी आहेत. नेहमीप्रमाणे ते दुरान्तो एक्स्प्रेसनं मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या परतीच्या वाटा करोनाच्या संकटानं बंद करून टाकल्या.
-
गर्दीला रोखण्यासाठी राज्य सरकारनं मुंबईसह राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सगळी शुकशुकाट आहे. या संकटाचं गांभिर्य नसलेले अजूनही रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पण, त्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाना पोलिसांना रस्त्यावर उतरवलं आहे.
-
गेल्या दोन दिवसात मुंबई निपचित पडली आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा बंद आहे. कधीही दीर्घ विश्रांतीची सवय लोकल गाड्या कारशेडमध्ये निवांत उभ्या आहेत. पण, हे दृश्य चिंता वाढवणारं आहे.
-
संग्रहित छायाचित्र
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?