-
संपूर्ण देश सध्या करोनाशी लढण्यासाठी सज्ज झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं आपापल्या पातळीवर शक्य तेवढे प्रयत्न करीत आहेत. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या नियोजनासाठी निधीची कमतरता भासणारच. यासाठीच आता सर्वच क्षेत्रातील लोक सढळ हाताने सरकारला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. यामध्ये बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य कलाकारांचाही समावेश आहे. आज आपण कोणत्या कलाकाराने किती मदत केली आहे, हे जाणून घेणार आहोत. (सर्व छायाचित्रे : गुगल)
-
अक्षय कुमार – बॉलिवूडच्या या कलाकारानं २५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी त्याचं कौतुकही केलं आहे.
-
भूषण कुमार – टीसिरीजचे मालक भूषण कुमार यांनी ११ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे.
-
हेमा मालिनी – खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी १ कोटी रुपये दिले आहेत.
-
सलमान खान – सुमारे २५ हजार डेली वर्कर्सला सलमानने मदतीचा हात दिला आहे. यासाठी त्याने वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईजसोबत (fwic) चर्चा केली आहे.
-
रजनीकांत – ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी लॉकडाऊनचा फटका बसलेल्या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील कामगारांसाठी मदत जाहीर केली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी ते ५० लाख रुपये देणार आहेत.
-
ह्रतिक रोशन – या बॉलिवूड अभिनेत्याने मुंबई महानगरपालिकेच्या कामगार आणि मदतनिसांसाठी मदत जाहीर केली आहे. यामध्ये एन-९५ मास्क आणि एफएफपी ३ मास्क वाटप करणार आहे.
-
सनी देओलने ५० लाख रुपये आपल्या खासदार निधीतून देण्याचे घोषीत केले आहे.
-
वरुण धवन – बॉलिवूडच्या या तरुण अभिनेत्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळून ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे.
-
कपिल शर्मा – अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मानं ५० लाख रुपयांची मदत दिली आहे.
-
प्रभास – बाहुबली फेम प्रभासने ४ कोटी रुपये दिले आहेत.
-
पवन कल्याण – २ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
-
अल्लू अर्जुन – तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या कलाकाराने १.२५ कोटी रुपये दिले आहेत.
-
चिरंजीवी – दक्षिणेतील या वरिष्ठ कलाकाराने १ कोटी रुपयांची मदत दिली आहे.
-
महेश बाबू – दाक्षिणात्य चित्रपटातील हँडसम हंक नायक असलेल्या महेश बाबूनं १ कोटी रुपयांची मदत दिली आहे.
-
ज्युनिअर एनटीआरने ७५ लाख रुपये दिले आहेत.
-
राम चरण – करोनाशी लढणाऱ्या यंत्रणेसाठी राम चरणनं ७० लाख रुपये दिले आहेत.
-
नितीन – या अभिनेत्यानं २० लाख रुपयांची मदत देऊ केली आहे.
-
साई धरम तेजने १० लाख रुपये दिले आहेत.

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा