-
पुणे : तुळशीबागेतील राम मंदिर २५० वर्षे जुने असून इतक्या वर्षांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राम नवमीचा उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. राम मंदिरात पुजाअर्चा करताना विश्वस्त आणि पुजारी. (सर्व फोटो – पवन खेंगरे, पुणे)
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने तुळशीबागेतील रामजी संस्थानच्यावतीनं राम नवमीचा उत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला.
-
यंदा सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
-
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी तुरळक गर्दी केली होती.
-
करोनाचा धोका असल्याने भाविकांनी तोंडाला मास्क लावून प्रार्थनेसाठी हजेरी लावली.
-
मंदिरात आरतीदरम्यान लोकांनी काही प्रमाणात सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले.
-
प्रार्थनेसाठी महिला आणि पुरुषांनीही तुरळक हजेरी लावली होती.
-
अनेकांनी गाभाऱ्यातून जाऊन दर्शन न घेता गर्दी न करता काही अंतरावरुनच प्रभू रामाचे दर्शन घेतले.
-
करोनापासून बचावासाठी या भाविकाने तोंडाला रुमाल बांधून मंदिरात येणे पसंद केले.
-
करोनाच्या आजारापासून सर्वांचे रक्षण कर अशी मनोकामना तर या भाविकानं प्रभू रामाकडे व्यक्त केली नसेल?
-
इतर वेळी अगदी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत गर्दीने फुलून गेलेला हा तुळशीबागेतील मंदिर परिसर आज असा सुनसान दिसत आहे.
-
करोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा राम नवमीनिमित्त आयोजित गायन, प्रवचन, कर्तन रद्द झाल्याची नोटीस मंदिर परिसरात लावण्यात आली आहे.
-
मुंबई : लॉकडाउनमुळे वडाळ्यातील राम मंदिरातही सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (मुंबईतील सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)
-
तोंडाला मास्क बांधून मनोभावे प्रार्थना करताना एक भाविक.
-
कोराच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी इथे तोंडाला मास्क आणि रुमाल बांधून प्रार्थनेसाठी हजेरी लावली.
-
राम नवमीनिमित्त सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने मंदिराचा पुजारी काहीसा निवांत स्थितीत आणि भाविकांच्या प्रतिक्षेत.
-
भाविकांनी पुजेदरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन केले.
-
आरतीचा लाभही भाविकांना मंदिराच्या बंद दरवाजा आडूनच घेता आला.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…