-
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून लौकिक असलेल्या धारावीला उद्योगनगरी म्हणूनही संबोधले जाते. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
घरोघरी चालणाऱ्या कुटिरोद्योगांपासून चामडय़ाच्या मोठमोठय़ा कारखान्यांपर्यंत असंख्य उद्योगधंद्यांचे केंद्र असलेल्या या वस्तीत २४ तास गजबज असते. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
मात्र, ‘करोना’च्या प्रादुर्भावामुळे या उद्योगनगरीलाही खीळ बसली आहे. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
धारावीतील चामडय़ाचे कारखाने सध्या पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र आहे. तर ग्राहक घटल्याने अन्य उद्योगांतील उत्पादनही ठप्प झाले आहे. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
मुंबईकरच नाही तर देश-विदेशांतील पर्यटक धारावीत आवर्जून चामडी वस्तू (लेदर गुड्स) खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर येतात. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
मात्र, करोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर येथील परिस्थिती गंभीर असून जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं आहे. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास ३०० कुटुंब क्वारंटाइन करण्यात आली आहेत. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
यानंतर वरळीत सलग दोन रुग्ण आढळले आहेत. वरळीत राहणारा पण धारावीत काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्यालाही करोनाची लागण झाली आहे. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
तसंच एका ३५ वर्षीय डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
यामुळे धारावीचे संपूर्ण लेदर मार्केट आणि ९० फुटी मार्ग बंद करण्यात आला आहे. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
लेदरच्या वस्तूंना कापड, रेगजिन, फोम असे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने आधीच बाजार मंदावला आहे, त्यात करोनामुळे टाळे लावण्याची वेळ येथील व्यवसायिकांवर आली आहे. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
चामडी उद्योगाप्रमाणेच धारावीतील कुंभारवाडाही तितकाच प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक इथे भेट देतात. शिवाय देश-विदेशांत इथल्या मातीच्या वस्तू निर्यात केल्या जातात. करोनामुळे इथले सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
-
यामुळे १० लाख लोकसंख्या असणाऱ्या धारावीवर अवकळा पसरली असून जनजीवन ठप्प झालं आहे. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
-
हे फोटो पाहिल्यानंतर तुमचाही हीच ते नेहमी गजबज असणारी धारावी आहे यावर विश्वास बसणार नाही (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल