-
राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढला आहे. काळजी करण्यासाठी गोष्ट म्हणजे मुंबई आणि इतर शहरातील वसाहतींमध्ये करोनाचे रुग्ण आढळून येत असल्यानं कम्युनिटी ट्रान्समिशनचाही धोका वाढला आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्यानं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
मुंबई-पुण्यातील नागरी वसाहतींमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले. त्यानंतर सरकारनं अशा वसाहतींमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. तसेच त्याला आळा घालण्यासाठी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना तयार केली.
-
या माध्यमातून ज्या-ज्या वसाहतींमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले. तिथे या कृतियोजनेतंर्गत काम सुरू करण्यात आलं आहे.
-
करोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आल्यानंतर तो संपूर्ण परिसर सील करण्यात येतो. हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जातो.
-
या परिसरातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीनं एका पथकाची नेमणूक केली जाते. या पथकात एक कंटेनमेंट ऑफिसर आणि पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असतो.
-
करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचं हाय रिस्क आणि लो रिस्क या दोन गटात विभागणी केली जाते. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं जातं.
-
कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या इतर रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात.
-
कंटेनमेंट झोनच्या परिसरातील रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचा दैनंदिन अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो.
-
-
राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये एकूण २ हजार ४५५ पथके सर्वेक्षणाचं काम करत आहेत. सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
-
ज्या भागात करोनाचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तेथून तीन किमीपर्यंतचे सर्वेक्षण केलं जातं.
-
ही पथक सर्व उपकरणांसह सुसज्ज असतात. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे सर्वेक्षणाचं काम काम केलं जातं.
-
पथकाला नेमून दिलेल्या विभागात १४ दिवस दररोज सर्वेक्षण करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत.
-
या पथकांमध्ये आरोग्य कर्मचारी, एएनएम, हिवताप निर्मूलन कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आवश्यकता भासल्यास नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी आदींचा समावेश करण्यात येतो.
-
या पथकामार्फत सर्वेक्षणासोबतच करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कांत आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याच्या कामाबरोबरच करोनाबद्दल जनजागृती करण्याचंही काम करण्यात येतं.

Ashish Shelar : “राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते ते आता संपले…”, आशिष शेलार यांचं वक्तव्य