-
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साधेपणानेच साजरा होत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज अगदी साध्या पद्धतीने आणि निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्याचीच ही छायाचित्रे (फोटो: Twitter/micnewdelhi)
-
अगदी मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन केले. (फोटो: Twitter/micnewdelhi)
-
यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबरच सर्वच अधिकाऱ्यांनी तोंडावर मास्क लावले होते. (फोटो: Twitter/micnewdelhi)
-
झेंडावंदन करण्याआधी मुख्यमंत्री मंत्रालयामधील राजमाता जिजाऊ यांच्या फोटोसमोर असे नतमस्तक झाले. (फोटो: Twitter/micnewdelhi)
-
मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केलं. (फोटो: Twitter/micnewdelhi)
-
त्याचप्रमाणे मंत्रालयातील दालनामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर हात जोडून मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली. (फोटो: Twitter/micnewdelhi)
-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवनामध्ये झेंडावंदन करण्यात आलं. (फोटो: Twitter/airnewsalerts)
-
महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवनामध्ये पार पडला ध्वजारोहण सोहळा (फोटो: Twitter/airnewsalerts)
-
राजभवनामध्येही करोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला ध्वजारोहण सोहळा (फोटो: Twitter/airnewsalerts)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका