-
संपूर्ण जगभरात आज मातृ दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आपल्यासाठी नेहमी खस्ता खाणाऱ्या आईचा सन्मान करण्यासाठी १० मे हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. मराठी सिने-नाटक इंडस्ट्रीत काम करणाऱ्या सुमित पाटील या तरुणाने मदर्स डे निमीत्त एक भन्नाट संकल्पना अमलात आणली आहे.
-
काळानुरुप स्वयंपाक घरातून नामशेष होत चाललेल्या दगड, पितळ, तांब्यापासून बनवण्यात आलेल्या साधनांना सुमीतने आईचं स्वरुप दिलं आहे. हे खास फोटोशूट त्याने सोशल मीडियावर शेअर केलंय.
-
आजच्या पिढीतील अनेकांना जातं ही संकल्पना माहिती नसेल, पूर्वीपासून धान्य दळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या वस्तूला सुमितने रांगोळी आणि फुलांच्या सहाय्याने आईचं स्वरुप दिलं आहे. (संकल्पना आणि फोटो सौजन्य – सुमित पाटील)
-
धान्य निवडण्यासाठी आजही अनेक घरात सुप आणि रोवळीचा वापर होतो, या वस्तूलाही सुमितने सुंदर स्वरुपात मांडलं आहे.
-
आपल्या आईकडून मिळालेली वस्तू म्हणून आई अनेकदा जुन्यातला जुना पाटा-वरवंटा जपून ठेवते. या भावनेला सुमितने सुंदर पद्धतीने मांडलं आहे.
-
जुन्या काळात स्वयंपाक घरात वापरले जाणारे चमचे
-
आधुनिक जगात विळीची जागा चॉपर आणि अत्याधुनिक साधनांनी घेतली असेलही, पण आई ज्या पद्धतीने विळीवर भाजी चिरते त्याला कशाचीही सर येणार नाही.
-
दिवाळीत चकली, करंज्या तयार करण्यासाठी वापरली जाणारी भांडी, म्हणजे प्रत्येक आईचा जीव की प्राण
-
तांब्या-पितळ्याची भांडी, कळशी तर आता जवळपास हद्दपार होत आहेत. पण घरातल्या एका भांड्यात मग आपल्याला अचानक आपली आई दिसू लागते.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच