-
पुणे : आषाढी वारीला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची विधीवत पुजा करीत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरातच ठेवण्यात आल्या. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
यंदा करोनाचा संकट असल्याने पायी वारी रद्द करण्यात आली आहे. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
आज (शनिवार) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीप्रमाणे ही पालखी देखील मुख्य मंदिरात ठेवण्यात येऊ शकते. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
आषाढी एकादशी असल्याने या दिवशी दोन्ही पालख्या पंढरपुरात दाखल होत असतात. यंदा १ जुलै रोजी एकादशी असल्याने आदल्या दिवशी दोन्ही पालख्या विशेष विमानाने किंवा वाहनातून पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. (छायाचित्र – कृष्णा पांचाळ)
-
यावेळी केवळ ५० वारकऱ्यांनाच या सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. (छायाचित्र – कृष्णा पांचाळ)
-
तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती असली तरी त्यांच्या उत्साहात कमी नव्हती. अनेकांनी नेहमीप्रमाणे फुगड्या खेळून आनंद साजरा केला. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
अनेक महिलांनी काळजी घेत फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत तोंडाला मास्क लावून संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले. (छायाचित्र – राजेश स्टिफन) -
पारंपारिक पद्धतीने तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. (छायाचित्र – कृष्णा पांचाळ)
-
टाळ-मृदूंगाचा गजर, तुतारीची ललकारी देत वारकऱ्यांनी किर्तन करीत खेळही खेळले. (छायाचित्र – कृष्णा पांचाळ)
-
यावेळी प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडाला मास्क लावलेले होते. वारकऱ्यांनी प्रशासनाच्या हाकेला गांभीर्याने प्रतिसाद दिला होता. (छायाचित्र – कृष्णा पांचाळ)
-
यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. (छायाचित्र – कृष्णा पांचाळ)
पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल