-
तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रात परिचयाचं नाही अशी व्यक्ती मिळणं फार कठीण आहे. आपल्या शिस्तबद्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसंच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचं नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असतं. आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढे यांनी फार हाल अपेष्ट सहन करत यशाची उंची गाठली आहे. आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. एका मुलाखतीत त्यांनी याचा उलगडा केला होता.
-
तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे आहेत. गावाची लोकसंख्या सर्वसाधारणपणे पाच हजाराच्या आसपास आहे. हे गाव १०० टक्के शेतीवर निर्भर असून कोरडी जमीन असल्याने फार मेहनत घ्यावी लागते. संग्रहित फोटो (Facebook: We Support Tukram Mundhe Page)
-
तुकाराम मुंढे यांचं बालपण गावातच गेलं आहे. गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायची, त्यानंतर आठवडा बाजारात जाऊन भाजी विकायची. त्यानंतर आठवड्याभराचा संसार आणि दोन वेळचं जेवण आपल्याला भेटेल अशा दृष्टीने प्रयत्न करायचे अशी गावची परिस्थती होती. संग्रहित फोटो (Photo: Your Story)
-
तुकाराम मुंढे यांचं गावातच १० वीपर्यंत शिक्षण झालं. जिल्हापरिषद शाळेत शिक्षण घेत असताना तिथली शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच परिस्थितीत शिक्षण घेतलं. संग्रहित फोटो (Facebook: We Support Tukram Mundhe Page)
-
तुकाराम मुंढे यांनी नवव्या, १० व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनी चौथीत शिकत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत शेतीचं काम सुरु केलं होतं. (संग्रहित)
-
तुकाराम मुंढे यांचे वडीलबंधू बीडला शिक्षण घेत होते. महिन्याला १०० ते २०० रुपये पाठवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत होती आणि शेतीतून उत्पन्न कमी मिळत होतं. संग्रहित फोटो (Facebook: Tukaram Mundhe Page)
-
संग्रहित छायाचित्र
-
तुकाराम मुंढे यांनी पहिला सिनेमा दहावीनंतर पाहिला होता. त्यामुळे गावातून थेट औरंगाबादसारख्या शहरात येणं त्यांच्यासाठी खूप मोठा सांस्कृतिक धक्का होता. संग्रहित फोटो (Facebook: IAS Tukram Mundhe Page)
-
त्यावेळच्या परिस्थितीत कसं सामावून घ्यायचं माहित नव्हतं. पण त्यांच्या वडिलबंधूंनी मार्गदर्शन केलं. संग्रहित फोटो (Facebook: Tukaram Mundhe Page)
-
तुकाराम मुंढे यांच्या मोठ्या भावाला आयएएस व्हायचं होतं पण आर्थिक परिस्थिती बाजूने नसल्याने त्यांना शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ती अपेक्षा तुकाराम मुंढेंकडे व्यक्त करत तुला कलेक्टर व्हायचं आहे असं सांगितलं होतं. (संग्रहित)
-
कलेक्टर काय असतं? ते कसं व्हायचं असतं? त्यासाठी काय करावं लागतं? यातलं तुकाराम मुंढेंना काहीच माहिती नव्हतं. फक्त भावाने सांगितलं कलेक्टर व्हायचं म्हणून होणार यादृष्टीने ११, १२ वीचं शिक्षण सुरु केलं. त्यांनी सायन्स घेतलं होतं. (संग्रहित)
-
तुकाराम मुंढे यांनी सांस्कृतिक धक्क्यातून बाहेर येत असताना, शहरातील वातावरणाशी जुळवून घेणं आणि अभ्यास करणं, ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करणं याकडेच पूर्ण लक्ष दिलं आणि काम करत राहिले. संग्रहित फोटो (Facebook: IAS Tukram Mundhe Page)
-
तुकाराम मुंढे यांना १२ वीला बायोलॉजी ग्रुपला ९२ टक्के मार्क होते. संग्रहित फोटो (Facebook: Tukaram Mundhe Page)
-
तुकाराम मुंढे औरंगाबादला आले होते तेव्हा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न होता. त्यांचे बंधू तेव्हा क्लासेस घ्यायचे. त्याच्या माध्यमातून ते स्वत:चा आणि त्यांचा खर्च सांभाळत होते. तुकाराम मुंढे यांचं युपीएससीचा अभ्यास करायचं ठरलं होतं. संग्रहित फोटो (Facebook: IAS Tukram Mundhe Page)
-
बंधूंनी जेव्हा सांगितलं की, कलेक्टर व्हायचं आहे तेव्हा होता येईल असं आपण म्हणतो. पण ही परीक्षा काय असते हे त्यावेळेस माहिती नव्हते. पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत याची कल्पना नव्हती असं तुकाराम मुंढे सांगतात. (संग्रहित)
-
तुकाराम मुंढे यांनी युपीएससीचा अभ्यास करायला घेतला तेव्हा ही परीक्षा किती अवघड असते त्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात. नुसतं चार पुस्तकं वाचून किंवा बीए एमसाऱखा अभ्यास करुन त्यात यश मिळत नाही याची जाणीव झाली. यानंतर परिस्थिती आणखीन वाईट होत गेली. अनेक प्रश्न समोर उभे राहिले. संग्रहित फोटो (Facebook: IAS Tukram Mundhe Page)
-
पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता जर आपण युपीएससी किंवा आयएएस झालो नाही तर काय होणार हा प्रश्न तुकाराम मुंढे यांच्यासमोर होता. संग्रहित फोटो (Facebook: We Support Tukram Mundhe Page)
-
तुकाराम मुंढे पहिल्या प्रयत्नात मेन्समध्ये फेल झाले. त्यांना ८६५ मार्क मिळाले. जे मेरिटपेक्षा फार कमी होते. संग्रहित फोटो (Facebook: Tukaram Mundhe Page)
-
यानंतर तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. त्यात ते प्रिलिअम पास झाले पण मेन्समध्ये पुन्हा अपयश आलं. (Facebook: Tukaram Mundhe Page)
-
तुकाराम मुंढे यांचं एका बाजूला मन विषण्ण होतं, तर दुसऱ्या बाजूला ध्येय गाठायचं होतं. अशा परिस्थितीत हा प्रयत्न चालू होता. संग्रहित फोटो (Facebook: Tukaram Mundhe Page)
-
-
म्हणून तुकाराम मुंढे यांनी परत तिसरा प्रयत्न केला. यावेळी तुकाराम मुंढे यांनी प्रिलियम आणि मेन्स दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत पोहोचले. मुलाखत झाली पण अंतिम निवड झाली नाही. (संग्रहित)
-
२००० ते २००३ या काळात तुकाराम मुंढे यांनी लेक्चरशिप केली. त्याच्यातून मिळणाऱ्या पैशात पीएचडी सुरु केली. संग्रहित फोटो (Facebook: We Support Tukram Mundhe)
-
२००३ साली एमपीएससीचा अंतिम निकाल आला. तुकाराम मुंढे यांच्या यांचं क्लास २ मध्ये सिलेक्शन झालं. संग्रहित फोटो (Facebook: Tukaram Mundhe)
-
पण त्यावेळी तुकाराम मुंढे यांनी २००४ रोजी शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. मग त्यासाठी तयारी सुरु केली. संग्रहित फोटो (Facebook: Tukaram Mundhe)
-
पहिल्या तीन प्रयत्नात ज्या काही चुका झाल्या होत्या, त्रुटी होत्या त्यावर तुकाराम मुंढे यांनी विचार केला आणि लक्षात आलं की, जास्त अभ्यास करण्यापेक्षा युपीएससीसाठी गरज आहे त्यावर विचार मंथन केलं. संग्रहित फोटो (Facebook: Tukaram Mundhe Page)
-
लेक्चरशिप केल्याने उत्तरात काय अपेक्षित आहे याची त्यांना चांगली माहिती आली होती. संग्रहित फोटो (Facebook: IAS Tukram Mundhe Page)
-
२००४ साली तुकाराम मुंढे प्रिलिअम पास झाले, मेन्स पास होणार याची खात्री असल्याने त्यांनी मुलाखतीची तयारी सुरु केली. २००५ च्या एप्रिल-मे महिन्यात तुकाराम मुंढे यांची मुलाखत पार पडली. संग्रहित फोटो (Facebook: We Support Tukram Mundhe Page)
-
११ मे २००५ रोजी अंतिम निकाल आला त्यावेळी तुकाराम मुंढे यांची भारतातील रँक २० होती. संग्रहित फोटो (Facebook: IAS Tukram Mundhe Page)
-
तुकाराम मुंढे म्हणतात माझा हा प्रवास खडतर नक्कीच होता. पण हा प्रवास फोकस्ड आणि नियोजनबद्द असल्याने, तसंच माझ्या ध्येयापासून कोणत्याही प्रकारे विचलित न झाल्याने मी करु शकलो. संग्रहित फोटो (Facebook: IAS Tukram Mundhe Page)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?