-
अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावासाने काल मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावल्यानंतर, आज सकाळपासून देखील रिपरिप सुरू केली आहे. यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. (सर्व फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
संततधारेमुळे शहराच्या अनेक भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने नोकरदारांबरोबरच छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील याचा फटका बसल्याचे दिसून आले.
-
अनेक भागांमध्ये तर मुलं रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात पोहताना दिसत आहेत.
-
जलमय झालेल्या रस्त्यांवरून मार्ग काढताना चाकरमान्यांची तारांबळ होत आहे.
-
वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने, नोकरदार मंडळींना पाण्यातून कसतर करत मार्ग काढावा लागत आहे.
-
मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
-
मुंबईत झालेल्या पावसाने ३८ ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा खोळंबा झाला.
-
समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
-
काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांसह नागरिाकाचे चांगलेच हाल झाले.
-
मुंबईत झालेल्या पावसाने ३८ ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा खोळंबा झाला.
-
पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयांसह संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
-
अंधेरी सबवे आणि किंग्ज सर्कल भागात तुलनेने जास्त पाणी होते.
-
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे.
-
पुढील एक ते दोन दिवसांत कोकण विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
राज्याच्या किनारपट्टीवर या काळात सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे.
-
संग्रहीत छायाचित्र
-
-
हवामान विभागाने मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड व नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO