-
बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला 'प्रिंस ऑफ कोलकाता' म्हणूनही ओळखलं जाते. अनेकजन गांगुलीला बंगाल टायगरही म्हणतात. गांगुलीचा आज वाढदिवस आहे.
गांगुलीचा जन्म कोलकातामधील बिजनेसमॅन चंडीदास आणि निरूपा गांगुली यांच्या घरी १९७२ मध्ये झाला होता. गांगुलीचे वडील कोलकातामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक होते. सौरव गांगुली क्रिकेटमध्ये आल्यानंतर देशासह जगभरात प्रसिद्ध झाला. -
गांगुलीने पेंट्स सीजन -२ च्या माध्यमातून आपलं घर दाखवलं होतं. आपल्या घराबद्दलच्या खास गोष्टी सांगतल्या. गांगुली म्हणतो, की घरात आल्यानंतर मला प्रसन्नता मिळते. तसेच निगेटिव्ह गोष्टी मनातून निघून जातात. गांगुली आजही त्याच घरात राहतात, जिथे लहानपण गेलं होतं. या घरातून गांगुलीला सकरात्मक ताकाद मिळते. मागील ६४ वर्षांपासून गांगुलीचं परिवार या शाही घरात राहतेय. वर्षाला घराचं नवीन प्रकारचे इंटीरियर आणि रंगकाम केलं जातं. लाइफस्टाइलमध्ये गांगुली सर्वात जास्त आपल्या घरांवर पैसा खर्च करतो. घर नेहमी स्वच्छ असावं असं गांगुलीला वाटते. -
गांगुलीच्या या शाही घरात ४८ खोल्या आहेत. यामधील एका रुममध्ये क्रिकेटशी निगडीत सर्व आठवणींना साठवल्या आहेत.
फोटोंमध्ये तुम्ही गांगीलच्या घरातील क्रिकेटशी निगडित कलेक्शन पाहू शकता…यामध्ये अवार्ड आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत. -
गांगुलीला आपल्या घरात स्वच्छ सुर्य प्रकाश हवा असतो. त्यामुळे हवा खेळती राहते.
-
दादाच्या घरातील इंटीरियर खूप खास आहे.
-
भारतीय संघातील दिग्गज खेळाडू सचिन, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण यांनीही दादाच्या घरी हजेरी लावली आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”