-
नवी मुंबई : गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसामुळे येथील देहरंग धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे पनवेलकरांचा पाणी वर्षभराचा पाणीप्रश्न सुटला आहे. (सर्व छायाचित्रे – नरेंद्र वासकर)
-
धरण पूर्णपणे भरल्याने अतिरिक्त पाणी त्याच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.
-
माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल महापालिकेच्या २७७ हेक्टर जमीनीपैकी १२५ हेक्टर क्षेत्रावर हे धरण बांधण्यात आले आहे.
-
पनवेल शहरातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी देहरंग धरण महत्वपूर्ण आहे. या धरणातून पनवेल शहराला रोज १२ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो.
-
मार्च-एप्रिलमध्ये हे धरण कोरडं पडलं होतं. मात्र, आता समाधानकारक पाऊस पडल्यानं धरणं पूर्ण क्षमतेनं भरलं आहे.

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा