-
देशात असे अनेक लोक आहेत ज्यांचं जीवन कोणासाठीतरी प्रेरणादायी ठरु शकतं. असाच प्रेरणादायी जीवनप्रवास असलेले महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याबाबत गोष्टी जाणून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. (सर्व फोटो – डॉ. राजेंद्र भारुड (IAS) यांच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवरुन)
-
डॉ. भारुड यांनी आपल्या लहानपणीची हालाखीची परिस्थिती कधीही आपल्या उर्वरित जीवनावर वरचढ होऊ दिली नाही.
-
त्यांनी जीवनात असं यश संपादन केलं ज्याची लोक केवळ कल्पनाच करु शकतात.
-
डॉ. भारुड हे पहिल्यांदा एमबीबीएस झाले त्यानंतर युपीएससी देऊन आयपीएस अधिकारी झाले. त्यानंतर पुन्हा युपीएससी देऊन आयएएस बनले.
-
७ जानेवारी १९८८ रोजी जन्म झालेले डॉ. राजेंद्र भारुड हे भिल्ल या आदिवासी समाजातील आहेत.
-
ज्यावेळी त्यांचा जन्मही झाला नव्हता आणि ते आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
-
आईच्या पोटात असताना लोकांनी त्यांच्या आईला गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांच्या आईने याला नकार दिला.
-
पतीच्या मृत्युनंतर त्यांच्या आईच्या खांद्यावर तीन मुलांची जबाबदारी येऊन पडली.
-
भारुड यांच्या आईने मुलांचे पालनपोषण करण्यासाठी सुरुवातीला मजुरीचे काम केले. मात्र, त्यात पुरेसे पैसे मिळत नसल्याने त्यांना नाईलाजाने देशी दारुही विकावी लागली.
-
लहानपणी घराबाहेर कट्ट्यावर बसून जेव्हा भारुड अभ्यास करीत असत तेव्हा दारुडे लोक त्यांना शिविगाळ करायचे.
-
तसेच अभ्यास करुन हा मुलगाही आपल्या आईप्रमाणेच दारुविक्री करेल, अशा शब्दांत लोक त्यांना हिणवायचे.
-
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या राजेंद्र भारुड यांनी दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के तर बारावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केले होते.
-
बारावीनंतर त्यांनी मेडिकलसाठी प्रवेश परीक्षा दिली आणि सरकारी कोट्यातून एमबीबीएससाठी पात्रही ठरले.
-
एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या तयारीसाठी स्वतःला झोकून दिले.
-
दरम्यान, ते पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा पास झाले.
-
या परीक्षेत त्यांना आयपीएसची रँक मिळाली. मात्र, भारुड यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न होते.
-
त्यानंतर त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा युपीएससीची परीक्षा देण्याचं ठरवलं आणि आयएएस बनण्याचं स्वप्नही पूर्ण केलं.
-
सध्या डॉ. राजेंद्र भारुड हे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
-
आएएस झाल्यानंतर आजही ते आपल्या मित्रांना आवर्जुन मिळेल तसा वेळ देतात.
-
बॉलिवूड कलाकार आमिर खान सारखे सेलिब्रेटिही डॉ. राजेंद्र भारुड यांच्या यशाने स्तंभीत होतात.
-
असे हे झुंजार आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आपली आई, पत्नी आणि मुलासोबत आनंददायी आयुष्य जगत आहेत.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल